Angar Controversy: अनगरमध्ये लोकशाही की ठोकशाही? थिटेंचा अर्ज बाद झाला की केला?

Democracy Vs Dictatorship Debate In Solapur Angar: सोलापूर जिल्ह्यातील अनगरमध्ये लोकशाही आहे की ठोकशाही? असा प्रश्न निर्माण झालाय.. मात्र त्याचं नेमकं कारण काय? अनगर नगरपालिकेत कशा पद्धतीने ठोकशाही दिसून आलीय? आणि राजन पाटलांवर काय आरोप केले जात आहेत?
Police-protected nomination filing of Ujjwala Thite sparks major controversy in Angar, Solapur.
Police-protected nomination filing of Ujjwala Thite sparks major controversy in Angar, Solapur.Saam Tv
Published On

एवढ्या पोलीस बंदोबस्तात निवडणुकीसाठी अर्ज दाखल करायला जावं लागणं....हे चित्र युपी किंवा बिहारमधील नाही... तर हे दृश्य आहे सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातील अनगरमधील..... होय....हिच आहे माजी आमदार आणि भाजप नेते राजन पाटील यांच्या अनगरमधील लोकशाही....राजन पाटलांच्या दबावामुळेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्वला थिटेंना कडेकोट पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला....

मात्र हा ड्रामा इथंच संपला नाही... तर उज्वला थिटेंनी अर्ज दाखल केल्यानंतर सहीचं तांत्रिक कारण देत उज्वला थिटेंचा उमेदवारी अर्ज छाननीत बाद झाला आणि राजन पाटलांची सून प्राजक्ता पाटील अनगरच्या बिनविरोध नगराध्यक्षा झाल्या....मात्र स्वतःच्या मुलाने सूचक म्हणून सही केली असताना अर्ज बाद झालाच कसा? असा सवाल उज्वला थिटेंनी केलाय..

दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटलांनी तर टेक्निक वापरुन अर्ज बाद केल्याचा आरोप केलाय.. मात्र अनगरमधील या महाभारताची सुरुवात झाली लोकांचा मतदानाचा हक्क हिरावून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी..... राजन पाटलांनी सर्व नगरसेवकांच्या जागा बिनविरोध काढल्या... मात्र नगराध्यक्षपदासाठी राजन पाटलांची सून प्राजक्ता पाटील यांच्याविरोधात उज्वला थिटेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं हा संघर्ष रंगला... थिटेंनी अर्जच दाखल करु नये म्हणून राजन पाटलांनी व्यूहरचना केली...

मात्र थिटेंनी अर्ज दाखल केलाच.... आता थिटेंचा अर्ज छाननीत बाद झाला असला तरी त्यामागे खरंच थिटेंची चूक आहे की निवडणूक यंत्रणेने राजन पाटलांच्या ठोकशाहीपुढे नतमस्तक होऊन केलेलं षडयंत्र... याची चौकशी होऊन दूध का दूध आणि पानी का पानी करण्याची गरज आहे....

याबरोबरच लोकशाही ही लोकांसाठी ाणि लोकांमार्फत चालवली जाते... मात्र देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत अनगरमधील ग्रामपंचायत बिनविरोध केली जातेय.... यामागे लोकशाहीचं कारण आहे की ठोकशाहीने राबवलेलं राजकारण... हे थिटेंच्या अर्जाच्या निमित्तानं उघड झालंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com