Identity Proofs For Voting Yandex
मुंबई/पुणे

Election Voting: ओळखपत्र नसेल तरी करता येणार मतदान; १२ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य, निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती

Identity Proofs For Voting: मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य आहेत, असं निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता मतदान ओळखपत्र नसेल तरी मतदान करता येणार आहे.

Rohini Gudaghe

रूपाली बडवे, साम टीव्ही मुंबई

मतदान (Lok Sabha) करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर १२ पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना (Election Voting) मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.मुंबई शहर जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात सोमवार दि. २० मे २०२४ रोजी मतदान होणार आहे.

सर्व नोंदणीकृत मतदारांना यादी भाग क्रमांक, मतदान केंद्र, मतदानाची तारीख आणि वेळ या माहितीच्या वोटर स्लिप निवडणूक कार्यालयाकडून वितरित केल्या जात आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी यादव यांनी दिली आहे. आता मतदारांना छायाचित्र असलेलं ओळखपत्र अनिवार्य आहे. मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी ते सादर करावं लागणार आहे. जे मतदार असं ओळखपत्र सादर करू शकनार नाहीत, त्यांना निवडणूक निवडणूक आयोगाने सांगितलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा सादर करावा लागणार आहे. तो ग्राह्य धरण्यात येणार आहे.

हे बारा पुरावे कोणते आहेत?

वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), पारपत्र (पासपोर्ट), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या (Identity Proofs For Voting) नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे १२ पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.

मुंबई शहर जिल्ह्यामध्ये ३७३ अनिवासी भारतीय (एनआरआय) मतदार आहेत. या मतदारांचे नाव मतदान यादीत असल्यामुळे त्यांना मूळ पास पोर्ट असेल तर मतदान करता येईल. परंतु, प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख (Mumbai Election) पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे, अशी ही माहिती जिल्हाधिकारी यादव यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT