El Niño impact on India monsoon Saam TV Marathi
मुंबई/पुणे

El Niño : मान्सून का रेंगाळला? 'एल निनो'चा महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? पुण्यात पाऊस कधी कोसळणार? पाहा IMD चा अंदाज

El Niño imcat Maharashtra Rain update : एल निनो सक्रिय झाल्याने महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मान्सूनचा वेग मंदावला असून शेतकऱ्यांना पेरणीबाबत सावधगिरीचा सल्ला देण्यात आला आहे.

Namdeo Kumbhar

El Niño impact on India monsoon 2026, Maharashtra rainfall : एल निनो प्रशांत महासागरात सक्रिय झाला असून, त्याचा परिणाम मान्सूनवर होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. एल निनोचा मान्सूनवर होणाऱ्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा ९० टक्के इतकाच पाऊस पडेल, असा अंदाज याआधी वर्तवण्यात आला आहे. जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या काळात एल निनोचा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता आहे. एल निनो सध्या सक्रिय झाला असून त्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढू शकते, असा अंदाज पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी व्यक्त केला.

यंदा मान्सूनचा पाऊस कमी प्रमाणात होणार आहे. मान्सूनचा प्रवास रखडला आहे. तो तळकोकणात आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रातील २ ते ४ जिल्ह्यांतच पोहोचला आहे. येणाऱ्या काही दिवसांत पावसाचे जास्त संकेत नाहीत. मान्सून महाराष्ट्रात पुढे सरकण्यासाठी वातावरण पोषक नाही. सध्या पडत असलेला पाऊस अवकाळी अथवा पूर्वमोसमी पाऊस आहे. या पावसाच्या आधारावर शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत. कृषी खात्याकडून देण्यात आलेल्या पेरण्याबाबतच्या सूचनांचे शेतकऱ्यांनी पालन करावे, असे सानप म्हणाले.

भारतात सरासरीपेक्षा ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात सरासरीपेक्षा कमीच पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतीचे नियोजन पावसानुसारच करावे.पुण्यात पुढील ५ दिवसांत मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. पण काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यात मान्सून कधी येतो, त्याची आपल्याला वाट पाहावी लागेल. सध्या मान्सूनसाठी पोषक वातावरण नाही, मान्सून महाराष्ट्रात पुढे सरकण्यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल, असेही सानप यांनी सांगितले.

यावर्षीचा मान्सूनदरम्यान होणारा पाऊस कमी पडेल. पुढील काही दिवस पावसाची शक्यता नाही. मान्सूनला पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल नाही. पूर्वमोसमी पावसावर अवलंबून राहून शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा पाऊस कमीच राहणार आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा सरासरीपेक्षा ९० टक्के इतकाच पाऊस पडेल, असे सानप यांनी सांगितले.

पुण्यात पाऊस कधी कोसळणार?

IMD च्या ताज्या अंदाजानुसार पुणे आणि परिसरात पुढील २ ते ३ दिवसांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने पुण्यासाठी यलो अलर्टही जारी केला असून, मान्सूनची पुढील प्रगती अनुकूल राहिल्यास 14 ते 16 जूनदरम्यान शहरात अधिक व्यापक पावसाची सुरुवात होऊ शकते. IMD ने यंदा पुण्यात मान्सून आगमनाबाबत काहीशी अनिश्चितता कायम असल्याचे सांगितले. त्यामुळे काही भागांत जोरदार सरी तर काही भागांत केवळ ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thick Hair Tips : तुम्हालाही लांब, घनदाट आणि मजबूत केस हवेत? मग हे ६ घरगुती उपाय नक्की करा

Maharashtra News Live Update: उरळी कांचन येथे लक्ष्मण हाके यांच्या मोर्चामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी

Krishna Janmashtami 2026: यंदाच्या जन्माष्टमीला द्वापार युगासारखा दुर्मिळ महासंयोग! ४ राशींचं उजळणार भाग्य

Mangalsutra Designs: नवरा- बायकोच्या नावाचं मंगळसूत्र, या 5 डिझाईन्स पाहून प्रेमात पडाल

Thyroid Health : तुमचंही वजन विनाकारण वाढतंय? 'या' ५ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, असू शकतो थायरॉईड

SCROLL FOR NEXT