Surabhi Jayashree Jagdish
गिअर बदलण्यापूर्वी एक्सलेटर हळूहळू कमी करून पूर्ण सोडावा. त्यानंतर क्लच पूर्ण दाबून गिअर बदलावा. यामुळे इंजिनचा वेग कमी होऊन गिअर बदलणं सोपं होतं.
एक्सलेटर देऊन जर गिअर बदलला तर इंजिनचा वेग जास्त राहतो. त्यामुळे बाईक चालवताना अचानक झटका बसण्याची शक्यता असते. त्यामुळे वारंवार गिअर बदलल्यास क्लच आणि गिअरच्या भागांवर परिणाम होऊ सांगतो.
सर्वप्रथम एक्सलेटर सोडून क्लच पूर्ण दाबावा. त्यानंतर आवश्यक गिअर बदलून क्लच हळूहळू सोडावा. क्लच सोडताना बाइकच्या वेगानुसार एक्सलेटर पुन्हा हळूहळू द्यावा.
क्लच अचानक सोडल्याने इंजिनची शक्ती एकदम चाकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे बाइक पुढे जोरात झटक्याने जाऊ शकते किंवा इंजिन बंद पडू शकतं. म्हणून गिअर बदलल्यानंतर क्लच हळूहळू सोडणं आवश्यक आहे.
कमी वेगात जास्त गिअर वापरल्यास इंजिनवर ताण येतो आणि बाइक चालवताना धक्के जाणवू शकतात. जास्त वेगात कमी गिअर वापरल्यास इंजिनचा वेग अचानक वाढू शकतो. त्यामुळे बाइकचा वेग आणि इंजिनचा आवाज लक्षात घेऊन योग्य गिअर निवडा.
ज्यावेळी तुम्ही बाईक चालतवाना गिअर बदलता तेव्हा क्लच सोडणं टाळलं पाहिजे. जर तुम्ही अर्धवट क्लच दाबून बाईक चालवली तर क्लच प्लेट गरम होऊन त्याची झीड होण्याचा धोका असतो. त्यामुळे गिअर बदलताना पायाने जास्त जोर लावू नका.
गिअर बदलताना एक्सलेटर सोडल्याने इंजिनवरील शक्तीचा ताण तात्पुरता कमी होतो. त्यामुळे गिअर सहज बदलता येतो आणि बाइकची हालचाल अधिक सुरळीत राहते. योग्य पद्धतीने एक्सलेटर, क्लच आणि गिअर वापरल्यास बाइक चालवणं सोपं होतं.