Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो बँक खाते तपासा! 'या' तारखेला जमा होणार मे महिन्याचे पैसे; ३४५ कोटी मंजूर

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याच्या हप्त्यासाठी ३४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. १२ ते १५ जूनदरम्यान लाभार्थी महिलांच्या खात्यात १५०० रुपयांची रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana May Installment Update: लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारकडून ३४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भाजप आमदार मोनिका राजाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम १२ ते १५ जून दरम्यान महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. आमदारांनी ही तारीख सांगितली असली, तरी अद्याप या संदर्भात सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याच्या हप्त्यासाठी ३४५ कोट रूपये मंजूर करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे लवकरचं लाडकींच्या खात्यात मे महिन्याचा हफ्ता जमा होईल, असे सांगण्यात येत आहे. मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम पुढील २ ते ३ दिवसात जमा होईल असं सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com