Eknath Shinde at dasara melava  Saam tv
मुंबई/पुणे

Eknath Shinde : बाळासाहेब असते तर...; दसरा मेळाव्यात शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

Eknath Shinde Latest Speech : दसरा मेळाव्यात शिवसेना फुटीवर एकनाथ शिंदे यांनी मोठं भाष्य केलं. शिंदे यांनी पुन्हा एकदा बंडखोरीचं समर्थन केलं.

Vishal Gangurde

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोरेगाव नेस्को येथील दसरा मेळाव्यातून ठाकरे गट आणि विरोधकांवर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेतील बंडखोरीचं समर्थन केलं. 'आपण जो निर्णय घेतला. बाळासाहेब असते तर त्यांनीही शिवसैनिकांची पाठ थोपटली असती, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

एकनाथ शिंदे यांच्या भाषणातील मुद्दे

आज आपण पाहतोय की बळीराजा संकटात आहे. बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आहे. त्याचं दुःख मोठं आहे. शेती वाहून गेली आहे. त्याची जमीन खरडून गेली आहे. पशूधन वाहून गेलेय. घरांची पडझड झाली. स्वतः मी बांधावर जाऊन आलो. मी त्याचे दुख डोळ्याने पाहिले. अशा परिस्थितीत आपण मदतीचा हात दिला पाहिजे.

अनेक शिवसैनिक तिकडे मदत करतात. मदतीच्या गाड्या पोहोचतात. जिथे संकट तिथे शिवसेना, जिथं आपत्ती , तिथं शिवसेना जिथं संकट, तिथं तुमचा एकनाथ शिंदे धावून गेल्याशिवाय राहणार नाही हे आपलं धोरण आहे. मदतीचं तोरण हेच शिवसेनेचं धोरण आहे. जेव्हा आपत्ती येते तेव्हा शिवसेना धावून जाण्याचं काम करतेय.

महापुरामुळे बळीराजा कोलमडून गेला आहे. परंतु आपण सर्व त्याच्या पाठिशी आहोत. सरकार त्याच्या मागे आहे. म्हणून कुठल्याही अटी शर्ती बाजूला ठेवून मंत्रिमंडळात ठेवून मुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बळीराजाला मदतीचा हात, आधार दिला पाहिजे, आणि म्हणून जे काही या परिस्थितीत संकट मोठं आहे. लोक आम्हाला सांगत होते. अनेक वर्षांत आम्ही असा पाऊस, संकट पाहिलं नाही. सगळं उद्ध्वस्त झालं. आपण त्यांच्या मागे राहिलं पाहिजे. म्हणून हा निर्णय घेतला.

आपल्या मेळाव्यात आजूबाजूचे लोक आहेत, बाकीचे सगळे तिकडे मदत करतात. दसरा सण मोठा आहे. यावेळचा दसरा मात्र, पुराचं सावट आहे. संकट आहे. अशा परिस्थितीत आपला बळीराजा, अन्नदाता त्याच्या मागे उभं राहण्याचं काम शिवसेना करतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेनेतर्फे अवघ्या १० रुपयांत दिवाळी फराळ साहित्य वाटप

Worst Drinks for Kidney: किडनीला आतून पोखरतात हे 5 ड्रिंक्स; चवीच्या नादात आरोग्याचं नुकसान करू नका

Moong vs Chana Sprouts: मूग की चणा स्प्राउट्स, वजन कमी करण्यासाठी सकाळी नाश्त्याला काय खावे?

Pune Fort : मराठा साम्राज्याचा शेवटचा किल्ला कोणता? पुण्याजवळ लपलाय 'हा' ऐतिहासिक खजिना, दिवाळीच्या सुट्टीत नक्की फिरा

Farmers Protest: शेतकरी आंदोलनाचा तिसरा दिवस, पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्पच; परिवहन विभाग अन् गोकुळच्या दूध विक्रीला फटका

SCROLL FOR NEXT