Maharashtra Politics : संजय राऊतांचे झोंबणारे बाण, शिंदेसेना हैराण; मेळाव्याआधी पुन्हा खऱ्या शिवसेनेवरून वाद,VIDEO

Shivsena politics : दसरा मेळाव्याआधीच दोन्ही शिवसेनेत चांगलीच खडाजंगी रंगलीय.. शिवसेनेच्या जन्मावरुन एकमेकांवर टीकेचे बाण सोडले जात आहेत... मात्र राऊतांनी सोडलेले कोणते बाण शिंदेसेनेला झोंबलेत? आणि त्याला शिंदेसेनेनं काय उत्तर दिलंय? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
Maharashtra Politics
Shivsena politics Saam tv
Published On

दसरा मेळाव्यावरुन दोन्ही शिवसेनेत जोरदार वाक् युद्ध रंगलंय.. दसरा मेळाव्यासाठी शिंदेंनी अंगावर भगवी शाल घेतलेला टीजर प्रसिद्ध केला आणि राऊत चांगलेच भडकले... शिंदेंची शिवसेना चोरबाजारातला माल आहे, असं म्हणत राऊतांनी शिंदेंवर झोंबणारे बाण डागलेत..एवढंच नाही शिवसेनेची स्थापना झाली तेव्हा शिंदे कोणत्या गोधडीत होते, असा खोचक सवाल केलाय...

Maharashtra Politics
Scheduled Caste : अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण केलं नाही, तर...; फडणवीस सरकारला कुणी दिला मोठा इशारा?

दुसरीकडे संजय राऊतांची टीका शिंदेसेनेच्या चांगलीच जिव्हारी लागलीय.. शिवसेनेचा जन्म झाला तेव्हा राऊत सुपारी घेऊन आनंद दिघे आणि शिवसेनेची बदनामी करत होते, असा पलटवार शिंदेसेनेनं केलाय.

Maharashtra Politics
Ladki Bahin Yojana ekyc : पती, वडीलांचे e-KYC बंधनकारक; लाडकींची संख्या आणखी घटणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

1966 मध्ये बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली.. त्यानंतर दसरा मेळाव्याची परंपरा सुरु झाली.. पुढे RSS आणि शिवसेनेचा दसरा मेळावा अनेकांचं आकर्षण बनला.. बाळासाहेब ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर जमायचे..मात्र 2022 मध्ये शिवसेनेची 2 शकलं झाली.. त्यामुळे शिंदेसेना विरुद्ध ठाकरेसेना गर्दी खेचण्यासाठी प्रयत्न करतात.. आता निम्म्या राज्यात ओला दुष्काळ पडलाय.. त्यामुळे मेळाव्यावर पावसाचं सावट असतानाही ठाकरे गर्दी खेचण्यात यशस्वी होणार की शिंदे? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com