Scheduled Caste : अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण केलं नाही, तर...; फडणवीस सरकारला कुणी दिला मोठा इशारा?

Scheduled Caste sub-classification : उपवर्गीकरणावरून लहुजी शक्ती सेनेने फडणवीस सरकारला मोठा इशारा दिलाय. या इशाराऱ्यानंतर सरकार काय भूमिका घेते, हे पाहावे लागेल.
lahuji shakti sena
Scheduled Caste sub-classificationSaam tv
Published On
Summary

लहुजी शक्ती सेनेचा अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाची मागणी करत सरकारला इशारा

उपवर्गीकरण न झाल्यास धर्मांतराची चळवळ उभारण्याचा इशारा

तुळजाभवानी मंदिरात महाआरतीवेळी सुरक्षा रक्षक व कार्यकर्त्यांमध्ये तणाव

तर पुढच्या दसऱ्याला हिंदू म्हणून देवीला दर्शनास येणार नाही, असा सेनेचा इशारा

बालाजी सुरवसे, साम टीव्ही

ओबीसी आरक्षणानंतर आता अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनुसूचित जातीच उपवर्गीकरण व्हावे, याची मागणी मातंग समाजाने लावून धरली आहे. या मागणीसाठी लहुजी शक्ती सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मातंग समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही, तर धर्मांतराची चळवळ हाती घेणार, असा इशारा लहुजी शक्ती सेनेने तुळजापुरातून सरकारला दिला आहे.

लहुजी शक्ती सेनेचे कार्यकर्ते तुळजापुरात पोहोचले होते. यावेळी लहुजी शक्ती सेनेच्या विष्णू कसबे यांनी सरकारला मोठा इशारा दिला. कसबे म्हणाले, 'हिंदूंच्या सर्व सणांमध्ये आमचा सहभाग असतो. हिंदुत्ववादी सरकारने आमचा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा. मुख्यमंत्री आणि सरकार आणि हिंदू समाजाने आमच्याकडे लक्ष दिलं नाही, तर पुढच्या दसऱ्याला आम्ही हिंदू म्हणून देवीला येणार नाही. मातंग समाजाचे अबकडनुसार वर्गीकरण करुन समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या'.

lahuji shakti sena
Chennai Shocked : थर्मल पॉवर प्लांटमध्ये मचान कोसळला, ९ मजुरांचा जागीच मृत्यू, चेन्नईत घडली दुर्घटना

'लहुजी शक्ती सेनेचे तुळजाभवानी भवानी चरणी साकडं आहे. लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी तुळजाभवानी मातेची महाआरती करुन साकडे घातले. गेली अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करुनही सरकार दखल घेत नसल्याने हिंदू धर्म सोडून इतर धर्मांत धर्मांतर करणार असल्याचाही इशारा कार्यकर्त्यांनी दिला. दरम्यान, तुळजाभवानी देवीला महाआरती करण्यापूर्वी मंदिराचे सुरक्षा रक्षक आणि लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाल्याने काही काळ तणाव होता.

lahuji shakti sena
Pune Andekar Gang : आंदेकर टोळीचे पाय आणखी खोलात; व्यावसायिकाकडून उकळली ५.४ कोटींची खंडणी

एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी धनगर समाजाचं आंदोलन

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जालना रोडवरील गाढे जळगावात धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. धनगर समाजाने मेंढ्या रस्त्यावर आणून रस्ता रोको केला. आंदोलकांनी जवळपास एक तास रास्ता रोको केला. आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर ते जालना रोड बराच काळ ठप्प झाला होता. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी जालनामध्ये सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. धनगर समाजाला एसटी प्रवर्गमध्ये तातडीने आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com