Chennai Shocked : थर्मल पॉवर प्लांटमध्ये मचान कोसळला, ९ मजुरांचा जागीच मृत्यू, चेन्नईत घडली दुर्घटना

Chennai Shocking News : थर्मल पॉवर प्लांटमध्ये मचान कोसळलाय. या घटनेत ९ मजुरांचा जागीच मृत्यू झालाय. चेन्नईत ही दुर्घटना घडली आहे.
Chennai News
Chennai ShockingSaam tv
Published On
Summary

चेन्नईतील एन्नोर वीज प्रकल्पात घडली मोठी दुर्घटना

मचान कोसळल्याने ९ मजूर ठार झाले आहेत. तर अनेक जखमी

अपघातानंतर बचाव कार्य सुरू

घटनेने मजुरांच्या सुरक्षेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलंय

तामिळनाडूची राजधानी चेन्नईत मंगळवारी सायंकाळी मोठी दुर्घटना घडली. एन्नोर औष्णिक वीज प्रकल्पातील एका निर्माणाधीन साइटवर मचान कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत अनेक मजूर दबले गेले. याची माहिती मिळताच बचावत पथक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. या घटनेत ९ मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेतील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता घटनास्थळी मदतीसाठी धावाधाव सुरु आहे.

Chennai News
Lawrence Bishnoi Gang : कुख्यात लॉरेन्सचा खेळ खल्लास? बिष्णोई गँग दहशतवादी म्हणून घोषित; कुणी केला घोषणा?

एन्नोर औष्णिक वीज प्रकल्प हा चेन्नईतील कोसळ्यावर चालणारा वीज प्रकल्प आहे. या प्रकल्पाची १९७० रोजी स्थापना झाली. या प्रकल्पाची क्षमता ४५० मेगावॉट आहे. TANGEDCO अंतर्गत संपूर्ण राज्याला वीज पुरवठा करणारा महत्वाचा प्रकल्प आहे. प्रकल्पाच्या विस्तारासाठी बांधकाम सुरु आहे. या प्रकल्पाच्या विस्ताराचं बांधकाम सप्टेंबर २०२६ रोजी पूर्ण होईल.

Chennai News
Pune Accident : डान्सर गौतमी पाटीलच्या कारचा अपघात, मुंबई-बेंगळूरू महामार्गावर घडली दुर्घटना

वीज प्रकल्पाच्या नवीन जागेवर बांधकाम सुरु होतं. कामगार हे मचान बांधण्याचे काम करत होते. त्याचवेळी मचान कोसळलं. त्यानंतर कामगार ३० फुटांवरून कोसळले. या घटनेनंतर मोठा आवाज झाला. या घटनेची माहिती मिळताच इतर कामगार मदतीला धावले. त्यातील काहींनी वीज प्रकल्पातील अधिकाऱ्यांना माहिती दिली.

Chennai News
Fact Check : शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

दुर्घटनेची माहिती मिळताच औष्णिक वीज प्रकल्पाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलीस आणि प्रशासनाला माहिती दिली. यावेळी प्रशासकीय अधिकारी, पोलीस पथक पोहोचलं. या प्रकल्पातील मचान कोसळण्याचे नेमकं कारण अद्याप समजलेले नाही. घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य सुरु आहे. सध्या अपघाताची चौकशी केली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, चेन्नईतील या दुर्घटनेत ९ कामगारांचा मृत्यू झाला आहे. एका कामगाराची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तातडीने स्टॅनली रुग्णालयात नेण्यात आलं आहे. गंभीर जखमी असलेल्या कामगारावर उपचार सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com