Fact Check : शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

farmer loan : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा हिवाळी अधिवेशनात होणार असल्याचा दावा करण्यात आलाय...तसा मेसेज व्हायरल होतोय...पण, या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
Farmer
FarmerSaam tv
Published On

अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशी मागणी होतेय...आणि त्यांच्या या मागणीला राजकीय पाठिंबा मिळतोय...त्यातच आता शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच सरकार हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा करणार आहे का...? घोषणा करणार असेल तर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे...पण, त्याआधी व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं आहे की, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल घेत अनेक उपायांची सुरुवात केलीय. बँकांच्या थकबाकीचा अहवाल मागवून कर्जमाफीबाबत हिवाळी अधिवेशनात घोषणा करणार आहे'.

Farmer
Jalgaon Politics : माजी महापौराच्या फॉर्म हाऊसवर भलतेच उद्योग; पोलिसांकडून मोठी कारवाई, राजकारणात खळबळ

राज्यात लाखो शेतकरी कर्जाच्या संकटात अडकलेयत...राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकांकडे एकूण थकबाकी अंदाजे 25 हजार कोटींपेक्षा जास्त आहे...यामुळे 25 लाख शेतकऱ्यांना भविष्यात नवीन पीक कर्ज मिळण्यात अडचणी येतायत...आणि आता अतिवृष्टीने संकट ओढावलंय...यामुळे सरकार कर्जमाफी करेल अशी आशा आहे...त्यातच सरकार आता लवकरच कर्जमाफी करणार असल्याचा दावा केलाय...आम्ही याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला...यावेळी थेट कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली...

Farmer
India vs Pakistan : साहिबजादा फरहानचा माज उतरला; विकेट पडताच संतापला...पाहा व्हिडिओ

त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य काय?

निवडणुकीआधी सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिलं

कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता सरकार करणार

कर्जमाफीसाठी समिती अभ्यास करतेय फडणवीसांची माहिती

Farmer
Nilesh Ghaywal : गुंड निलेश घायवळने लंडनला जाण्यासाठी पासपोर्ट कसं मिळवलं? पोलिस यंत्रणेलाही पत्ता लागेना

महायुती सरकारने सध्या तरी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केलेली नाही...तात्पुरती शेतकऱ्यांना मदत केली जातेय...कर्जमाफी देण्यासाठी समिती अभ्यास करत असून, कर्जमाफीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कसा लाभ मिळेल हे पाहिलं जातंय...अशी माहिती फडणवीसांनी दिलीय...त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा सध्या झालेली नाही...सरकार कर्जमाफीबाबत विचार करत असल्याचं समोर आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com