Jalgaon Politics : माजी महापौराच्या फॉर्म हाऊसवर भलतेच उद्योग; पोलिसांकडून मोठी कारवाई, राजकारणात खळबळ

Jalgaon Political News : जळगावमध्ये माजी महापौराच्या फॉर्म हाऊसवर भलतेच उद्योग सुरु होते. या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या घटनेने जळगावमधील राजकारण खळबळ उडाली आहे.
Jalgaon Political news
Jalgaon PoliticsSaam tv
Published On
Summary

जळगाव पोलिसांनी माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसवर छापा

कॉल सेंटरद्वारे विदेशी नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक

पोलिसांकडून ३२ लॅपटॉप, ७ मोबाईल आणि इतर साहित्य जप्त

घटनेमुळे जळगाव राजकारणात मोठी खळबळ

संजय महाजन, साम टीव्ही

जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जळगावच्या माजी महापौर ललित कोल्हे यांच्या ममूराबाद रस्त्यावरील एल के फॉर्म हाऊसवर पोलिसांची छापेमारी करत बनावट कॉल सेंटरचा अड्डा उद्धवस्त केलाय. पोलिलांनी कारवाई करत माजी महापौर ललित कोल्हेसह आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांच्या कारवाईने जळगावच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Jalgaon Political news
Mumbai Police : एसीबीची मोठी कारवाई; मुंबई पोलीस दलातील २ बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

मिळालेल्या माहितीनुसार, बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी नागरिकांना विविध आमिष दाखवत लाखों रुपये लुटल्याच्या संशयावरून पोलिसांनी माजी महापौर ललित कोल्हे यांच्या सह आठ जणांना ताब्यात घेतलं. यामध्ये ३२ लॅपटॉप आणि ७ मोबाईल जप्त केले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्रक्रिया सुरू असल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाई मध्ये पोलिस तपासात आता काय निष्पन्न होते,या कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Jalgaon Political news
Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

पोलिसांच्या कारवाईमुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालीये. फॉर्म हाऊसवरील बनावट कॉल सेंटरमधून विदेशातील नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणात माजी महापौरावर कुणाचा हात आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

Jalgaon Political news
Maharashtra floods : महाराष्ट्र अतिवृष्टीच्या संकटात; शरद पवारांनी राज्य सरकारला सांगितले आपत्ती निवारणाचे उपाय

माजी महापौर हे आधी राज ठाकरेंच्या मनसेत होते. पुढे २०१८ साली त्यांची भाजपशी जवळीक वाढली. सप्टेंबर २०१७ साली ते जळगावचे महापौर झाले. त्याआधी मनसे आणि माजी मंत्री सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीच्या पाठिंब्याने उपमहापौर बनले होते. त्यांनी २००९ आणि २०२४ साली मनसेच्या तिकीटवर विधानसभा निवडणूक लढली होती. याच ललित कोल्हे यांना अटक केल्याने जळगावच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com