

मध्य रेल्वे मार्गावरील नेरळ रेल्वे स्थानकाला इंडियन ग्रीन बिल्डिंग काउंसिल म्हणजेच आयजीबीसीकडून सुवर्ण मानांकन मिळाले आहे. या रेल्वे स्थानकाला त्याच्या ऊर्जा कार्यक्षम पायाभूत सुविधा, शाश्वत वैशिष्ट्ये आणि प्रवासी सुविधांची दखल घेत आयजीबीसीने सुवर्ण मानांकन दिले. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने आपल्या रेल्वे स्थानक सुधारणा कार्यक्रमांतर्गत या रेल्वे स्थानकाचा विकास केला. आयजीबीसीने मुंबई विकास महामंडळाने केलेल्या कामाची दखल घेतली.
ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि प्रवाशांसाठी आधुनिक सुविधांचा समावेश केल्यामुळे नेरळ रेल्वे स्थानकाला हे मानांकन मिळाले आहे. या महिन्यात झालेल्या अंतिम मूल्यांकनानंतर देण्यात आलेले हे सुवर्ण मानांकन ऊर्जा, पाण्याची कार्यक्षमता, प्रवासी सुविधा, आरोग्य आणि स्वच्छता, स्मार्ट आणि हरित उपक्रम तसंच नाविण्य या ६ मापदंडांवर आधारित आहे.
नेरळ रेल्वे स्थानकाच्या छतावर ३७५ किलोवॅट क्षमतेची सौरऊर्जा यंत्रणा बसवण्यात आल आहे. ऊर्जा कार्यक्षम एलईडी दिवे, बीएलडीसी पंखे आणि स्टार रेटेड विद्युत उपकरणे ही या रेल्वे स्थानकाची वैशिष्ट्ये आहेत. या रेल्वे स्थानकामध्ये ४ सरकते जिने, ५ लिफ्ट आणि ४३७ प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
रॅम्प, सुलभ शौचालये आणि प्रवासी मार्गदर्शन फलकांच्या माध्यमातून प्रवेशयोग्यता सुधारण्यात आली आहे. इतर हरित उपायांमध्ये विद्यमान झाडांचे जतन, भूदृश्यीकरण, कचरा वर्गीकरण, सेंद्रिय कचऱ्यापासून खतनिर्मिती आणि सुधारित नैसर्गिक प्रकाश आणि वायुवीजन यांचा समावेश आहे. या रेल्वे स्थानकाचा विकास करताना पर्यावरण संवर्धन आणि प्रवासांच्या सविधांना प्राधान्य दिले जात आहे.
एमआरव्हीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही मान्यता मुंबईच्या उपनगरीय रेल्वे पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करताना पर्यावरणीय शाश्वतता आणि प्रवाशांची सोय यांचा मेळ घालण्याच्या मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या प्रयत्नांना प्रतिबिंबित करते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.