Hot Tea Health Risks: गरम-गरम चहा प्यायल्याने होतो कॅन्सर? नव्या संशोधनातून धक्कादायक बाब समोर

खूप गरम चहा किंवा कॉफी पिण्याने अन्ननलिकेच्या कॅन्सरचा धोका वाढतो का? नव्या अभ्यासात ६५ अंश सेल्सिअस तापमानाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. चहा-कॉफी किती थंड झाल्यानंतर प्यावी आणि कोणती काळजी घ्यावी, जाणून घ्या.
Hot Tea Health Risks
Hot Tea Health Riskssaam tv
Published On: 

हिवाळ्यात गरमागरम चहा किंवा कॉफी पिण्याची मजा काही वेगळीच असते. पण चहा-कॉफी खूप गरम असताना पिण्याची सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. एका नव्या अभ्यासातून अतिशय गरम पेय प्यायल्याने अन्ननलिकेच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो, असं समोर आलं आहे. त्यामुळे चहा-कॉफी गरम नव्हे, तर कोमट झाल्यानंतर पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

खूप गरम चहा-कॉफी पिणाऱ्यांना कॅन्सरचा धोका अधिक?

'इंटरनॅशनल जर्नल ऑफ कॅन्सर'मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात ब्रिटनमधील जवळपास 9.8 लाख लोकांच्या माहितीचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात जे लोक नेहमी अतिशय गरम चहा किंवा कॉफी पितात, त्यांच्यामध्ये अन्ननलिकेच्या कॅन्सरचा धोका अधिक असल्याचं आढळून आलं.

Hot Tea Health Risks
Vastu Tips for Fridge: फ्रीजमध्ये उष्टं आणि शिळं अन्न ठेवणं योग्य? वाचा वास्तुशास्त्रात काय नियम सांगण्यात आलेत

अभ्यासानुसार, गरम पेय पिणाऱ्यांमध्ये कॅन्सरचा धोका जवळपास दुप्पट, तर अतिशय गरम पेय पिणाऱ्यांमध्ये हा धोका जवळपास तिप्पट असल्याचं दिसून आलं.

चहा-कॉफी किती गरम असणं धोकादायक?

65 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त तापमान असलेलं पेय अतिशय गरम मानलं जातं. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने हे तापमान अतिशय गरम पेयांच्या श्रेणीत ठेवलं आहे. अशा तापमानातील पेय वारंवार प्यायल्यास अन्ननलिकेच्या आतील भागाला इजा होऊ शकते.

पण 65 अंश सेल्सिअस हेच तापमान प्रत्येकासाठी धोक्याची मर्यादा असेल असं नाही. प्रत्येक व्यक्तीची गरम पेय सहन करण्याची क्षमता वेगवेगळी असते. याशिवाय कपात ओतल्यानंतर चहा किंवा कॉफी हळूहळू थंड होत जाते.

कॅफेमध्ये मिळणारी कॉफी साधारणपणे 60 ते 65 अंश सेल्सिअस तापमानात दिली जाते. कॉफीची चव तयार होण्यासाठी ती आधी जास्त तापमानात बनवली जाते. त्यामुळे कॉफी थोडी थंड करून प्यायल्याने तिच्या चवीचा अनुभव बदलत नाही.

Hot Tea Health Risks
Bathroom Vastu Tips: बाथरूममध्ये वॉशिंग मशीन ठेवणं योग्य आहे का? जाणून घ्या वास्तूशास्त्र काय सांगतं? वाचा नियम

चहा-कॉफी कोमट करून पिण्याचा सल्ला

चहा किंवा कॉफी पिणं बंद करण्याची गरज नाही. पण ती खूप गरम असताना पिणं टाळावं. चहा-कॉफी थोडी थंड होऊ द्यावी आणि कोमट झाल्यानंतर प्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

अभ्यासात नेमकं काय तपासलं?

ऑक्सफर्डच्या या अभ्यासात अन्ननलिकेच्या आतील भागाला झालेली इजा थेट तपासण्यात आली नव्हती. संशोधकांनी कॅन्सरच्या नोंदींच्या आधारे अन्ननलिकेच्या कॅन्सरचे नवे रुग्ण तपासले. त्याचप्रमाणे लोक चहा किंवा कॉफी किती गरम पितात आणि किती वेळा पितात, याची त्यांनी दिलेली माहिती विचारात घेतली. अन्ननलिकेच्या आतील भागाला झालेली इजा हा या अभ्यासाचा थेट निष्कर्ष नव्हता.

चहा-कॉफी नव्हे, तर अतिउष्ण तापमान धोकादायक

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, चहा किंवा कॉफीमुळे नव्हे, तर ती अतिशय गरम असताना वारंवार प्यायल्याने अन्ननलिकेवर उष्णतेचा परिणाम होऊ शकतो. या उष्णतेमुळे अन्ननलिकेच्या आतील भागाला इजा होऊन कालांतराने सूज येऊ शकते. त्यामुळे हिवाळ्यातील आवडता चहा किंवा कॉफी पिणं बंद करण्याची गरज नाही. फक्त ती गरमागरम पिण्याऐवजी कोमट झाल्यानंतर पिण्याची सवय लावावी. रोजच्या सवयीतील हा छोटासा बदल आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.

Hot Tea Health Risks
Washing Machine Vastu: घरात वॉशिंग मशीन कुठे ठेवताय? योग्य दिशा माहिती नाही? वास्तू शास्त्रात सांगितलेत महत्त्वाचे नियम

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.