Bihar Election : निवडणकीआधीच मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; फायरब्रँड नेता पक्षाला रामराम ठोकणार

Bihar Election news update : निवडणकीआधीच बिहारच्या मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का बसणार आहे. जदयूचा फायरब्रँड नेता पक्षाला रामराम ठोकणार असल्याची माहिती मिळत आहे.
Bihar Election
Bihar Election news update Saam tv
Published On
Summary

आमदार डॉ. संजीव कुमार लवकरच आरजेडीमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता

डॉ. संजीव कुमार यांनी तेजस्वी यादव यांची भेट घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण

खगडियात होणाऱ्या सभेत अधिकृत प्रवेश होण्याची शक्यता

डॉ. संजीव कुमार यांच्या पक्षांतरामुळे आरजेडीला भूमिहार समाजाचा राजकीय लाभ होणार?

बिहार विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीदरम्यान जनता दल युनायडेट पक्षाला मोठा धक्का बसणार आहे. जनता दल यूनायटेडचे फायरब्रँड आमदार डॉ. संजीव कुमार हे आरजेडी पक्षात प्रवेश करण्याची मोठी शक्यता आहे. डॉ. संजीव कुमार यांनी आरजेडीचे तेजस्वी यादव यांची भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आलं आहे.

Bihar Election
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा शरद पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या शेकडो पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

तेजस्वी यादव आणि आमदार डॉ. संजीव कुमार यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ते मागील काही काळापासून जनता दल यूनायटेड पक्षावर नाराज आहेत. त्यामुळे डॉ. संजीव कुमार हे लवकरच आरजेडी पक्षात प्रवेश करू शकतात.

आमदार डॉ. संजीव कुमार हे येत्या ३ ऑक्टोबर रोजी तेजस्वी यादव यांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खगडियाच्या गोगरी येथे ३ ऑक्टोबर रोजी एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला डॉ. संजीव आरजेडी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

Bihar Election
Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला खोटा? अहवालात नेमकं काय?

दरम्यान, डॉ. संजीव हे मागील काही काळापासून पक्षात नाराज आहेत. त्यांनी जनता दल यूनायटेडच्या नेतृत्वाच्या विरोधतही वक्तव्य केलं आहेत. मागील वर्षी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार हे जानेवारीत इंडिया आघाडीची साथ सोडून एनडीएमला साथ दिल्याने डॉ. संजीव नाराज असल्याची चर्चा होती.

Bihar Election
Scheduled Caste : अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण केलं नाही, तर...; फडणवीस सरकारला कुणी दिला मोठा इशारा?

डॉ. संजीव यांची परबत्ता भागात मोठी पकड आहे. डॉ. संजीव यांनी जनता दल यूनायटेड यांची सोडून आरजेडी पक्षात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे राष्ट्रीय जनता दलाला भूमिहार समाजाचा मोठा फायदा मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com