eknath shinde News  Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : 'गंगाजल शुद्धच, पण काहींच्या विचारांचं काय?' शिंदे सेनेनं राज ठाकरेंना डिवचलं, VIDEO

Raj thackeray vs shinde group : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर मनसे आणि शिवसेनेतलं राजकीय वैर आणखी तीव्र झालंय. दादरमध्ये शिंदे सेनेनं एक बॅनर लावुन राज ठाकरेंना डिवचलं आहे. पाहूया एक रिपोर्ट...

Girish Nikam

राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरून शिंदे गटाचे नेते समाधान सरवणकर यांनी मनसेला डिवचंलय. दादरच्या शिवसेना भवनासमोर शिंदे सेनेने मोठा बॅनर उभारला. आणि 'गंगाजल शुद्धच, पण काहींच्या विचारांचं काय?' असा सवाल केला. साहजिकच यावरून मनसे नेते संतप्त झालेत.

तणाव निर्माण झाल्यानंतर महापालिकेनं हे बॅनर हटवले आहेत. दरम्यान, शिंदे सेनेच्या मनसे विरोधाला मोठं कारण आहे.विधानसभा निवडणुकीत माहिम मतदारसंघावरुन महायुतीत तणाव निर्माण झाला होता. मनसेचे उमेदवार अमित ठाकरेंविरोधात महायुतीचा उमेदवार देऊ नये, असा भाजपचा आग्रह होता. मात्र शिंदे सेनेचे उमेदवार सदा सरवणरकर यांनी माघार घेतली नाही.

अमित ठाकरेंचा पराभव झाला आणि ठाकरे गटाचे महेश सांवत विजयी झाले. त्यामुळे मनसे आणि एकनाथ शिंदेंमध्ये राजकीय दरी निर्माण झाली. . त्याचीच सुरवात कदाचित या बॅनरनं तर झाली नसेल ना.. मनसे आणि शिवसेनेतलं राजकीय वैर आगामी महापालिका निवडणुकीत अधिक तीव्र होणार असंच सध्याचं चित्र आहे. कुठल्या वळणावर जाणार याकडे सगळ्याचं लक्ष आहे. सध्यातरी गंगेत राजकारण न्हालं, असंच म्हणू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बारवी धरण 'ओव्हरफ्लो', धरणाच्या 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू

Maharashtra Rain Update : कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर; पुढील ५ दिवस कसं असेल वातावरण? जाणून घ्या

Money Saving Tips : या 5 गोष्टी तुम्ही चुकूनही खरेदी करु नयेत

मुंबईत गोविंदाचा मृत्यू, तोल गेला अन् खाली कोसळला; सणाला गालबोट

Maharashtra Politics: महायुतीच्या दोन्ही दादांमध्ये जुंपली; सोन्याच्या चमचावरून अजितदादा अन् चंद्रकातदादांमध्ये जुगलबंदी

SCROLL FOR NEXT