Sanjay Raut : पक्ष बदलणाऱ्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये, राज्यसभेत संजय राऊत भडकले, VIDEO

Sanjay Raut News : राज्यसभेत संजय राऊतांचा रुद्रावतार पाहायला मिळाला. पक्ष बदलणाऱ्यांनी बाळासाहेबांचं नाव घेऊ नये, अशा शब्दात संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला.
Sanjay raut News
Sanjay rautSaam tv
Published On

राज्यसभेतील चर्चेत संजय राऊत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राज्यसभेत बोलताना अडथळा आणल्याने संजय राऊत संतापले. दहा वेळा पक्ष बदलणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये,असं म्हणत संजय राऊत यांनी सुनावलं. संजय राऊत यांच्या टीकेनंतर सत्ताधाऱ्यांकडून काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे लक्ष लागलं आहे.

'आपला देश तुरुंग नाही. आपला देश धर्मशाळा नसेल, तर तुरुंग देखील नाही, असं म्हटल्यानंतर एका खासदाराने टिप्पणी केली. त्यानंतर संजय राऊत संतापले. 'तुम्ही बोलता तेव्हा आम्ही ऐकतो. आम्ही बोलताना तुम्ही बोलत राहता. तुम्हाला काय माहीत आहे? हे लोक दहा वेळा पक्ष बदलणारे आहेत. यांची टिप्पणी थांबवा. माझी वेळी आता सुरु झाली आहे'.

Sanjay raut News
Jaykumar Gore : मंत्री जयकुमार गोरेंच्या मुलाची जीवघेणी स्टंटबाजी? व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

ठाकरे गट-शिंदे सेना आमने-सामने

हिंदुत्वाच्या मुद्यावरुन ठाकरे गट आणि शिंदेसेना आमने-सामने आलीय. भाजपला मिशा फुटल्या नव्हत्या. त्यावेळी आम्ही हिंदुत्वाच्या मिशांना पीळ देत फिरत होतो, असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केलाय. संजय राऊतांच्या टीकेला खासदार नरेश म्हस्केंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'क्राईम डायरी लिहिणाऱ्यांनी आम्हाला हिंदूत्व शिकवू नये' असं नरेश म्हस्के म्हणाले आहेत.

Sanjay raut News
Navi Mumbai : ५ मजली अनधिकृत इमारत, ९० छोटे फ्लॅट; सिडकोने थेट जेसीबी फिरवला, शेकडो बेघर

वक्फ सुधारणा विधेयकाला शिंदे गटाचा पाठिंबा

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेमध्ये चर्चेसाठी आला आहे. या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर आज उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्र या तीन राज्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आलाय. अनेक ठिकाणी पोलिसांकडून ड्रोनद्वारे लक्ष ठेवलं जाणार आहे. यामुळे संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाने वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला आहे.

Sanjay raut News
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांच्या भावाने घेतली अजित पवारांची भेट; दोघांमध्ये काय चर्चा झाली?

भोपाळमध्ये मुस्लिम महिला रस्त्यावर

वक्फ सुधारणा विधेयकासाठीभोपाळमध्ये मुस्लिम महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी मोदींच्या समर्थनात पाठिंबा देण्याची घोषणाबाजी केली. हातात फलक आणि गुलाबाचं फुल घेत मोदींना पाठिंबा दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com