नगरपरिषद निवडणुकीत शिंदेसेनेला मोठा बुस्टर मिळाला.
स्वबळावर लढत शिंदेसेनेनं ठाकरेंच्या गटापेक्षा पाचपट यश मिळवलं.
राज्यभरात शिंदेसेनेचे 60 नगराध्यक्ष निवडून आले.
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत शिंदेसेनेनं नवा विक्रम केलाय. भाजपच्या आश्रयामुळेच शिंदेसेनेला यश मिळतं या समजाला तडा देत शिंदेंनी स्वबळावर महाविकास आघाडीच्या एकत्रित यशापेक्षा मोठा स्ट्राईक रेट नोंदवलाय. राज्यात शिंदेसेनेच्या तब्बल 60 नगराध्यक्षांनी विजय मिळवलाय.
शिवसेनेच्या इतिहासात शिंदेंनी पहिल्यांदाच तब्बल 135 नगराध्यक्षपदांसाठी उमेदवार मैदानात उतरवले होते. त्यातच कोकणात निलेश राणे, उदय सामंतांसह दीपक केसरकरांनी तर रायगडमध्ये भरत गोगावलेंनी खिंड लढवली. दुसरीकडे हिंगोलीत संतोष बांगर यांनी तर शहाजीबापू पाटलांनी भाजपविरोधात जोरदार टक्कर दिली. राज्यातील तब्बल 60 नगरपरिषदेत प्रतिष्ठेच्या लढतीत शिंदेसेनेनं बाजी मारलीय.
खरंतर लोकसभा निवडणुकीत 15 पैकी 7 जागांवर शिंदेसेना विजयी झाली.. मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढल्याचं दिसून आलं. विधानसभा निवडणुकीत शिंदेंनी 90 जागा पदरात पाडून घेतल्या. आता मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यापार्श्वभुमीवर शिंदेंनी नगरपरिषद निवडणुकीत दुसरा क्रमांक पटकावलाय.. तर कोकणात सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आणलेत. त्यामुळे या निकालाचा फायदा उचलत शिंदे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात सर्वाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबावतंत्राचा वापर कऱण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे शिंदें आपली दावेदारी कायम ठेवणार की समाधानकारक जागा न मिळाल्यानं स्वबळाचा नारा देणार. याचीच उत्सुकता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.