Kalyan Politics: ऐन निवडणुकीत मनसेला पुन्हा झटका; बड्या महिला नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Former Corporator Tripti Bhoir Joins BJP: कल्याण-डोंबिवली महापालिकच्या निवडणुकीआधी मनसेला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेविका तृप्ती भोईर यांनी इंजिनची साथ सोडत कमळ हाती घेतलंय. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.
Former Corporator Tripti Bhoir Joins BJP:
Former Corporator Tripti Bhoir Joins BJP:saamtv
Published On
Summary
  • कल्याणमध्ये ऐन निवडणुकीत मनसेला मोठा धक्का.

  • माजी नगरसेविका तृप्ती भोईर यांचा भाजपमध्ये प्रवेश.

  • भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश.

संघर्ष गांगुर्डे/साम टीव्ही न्युज

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये मनसेला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. मनसेच्या माजी नगरसेविका तृप्ती भोईर यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. भाजपच्या आयोजित मेळाव्यात भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत तृप्ती भोईर यांनी भाजपची सदस्यता स्वीकारली.

Former Corporator Tripti Bhoir Joins BJP:
Sujay Vikhe Entry: 'टायगर अभी जिंदा है' ! शिर्डी नगरपालिकेत भाजपच्या जयश्री थोरातांचा शानदार विजय, चर्चेत आली सुजय विखेंची दिमाखदार एन्ट्री

या पक्षप्रवेशामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेच्या गोटात खळबळ उडाली असून, भाजपची ताकद कल्याणमध्ये अधिक वाढल्याचे चित्र आहे. तृप्ती भोईर या स्थानिक पातळीवर सक्रिय आणि ओळखीच्या नेत्या मानल्या जातात. त्याच बरोबर तृप्ती भोईर यांचे बंधू दिवंगत प्रमोद भोईर हे सुद्धा मनसेचे खंदे कार्यकर्ते होते.त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी निवडणुकीत राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Former Corporator Tripti Bhoir Joins BJP:
Chandrapur Election: पाच आमदार असूनही चंद्रपुरात भाजप फेल; काँग्रेसचा दणदणीत विजय

पक्षप्रवेशानंतर बोलताना तृप्ती भोईर यांनी स्पष्ट केले की, मनसे किंवा मनसेच्या नेतृत्वावर कोणतीही नाराजी नाही. मात्र माझ्या प्रभागातील विकासकामांना गती देण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्रभावीपणे न्याय देण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे,असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, भाजप प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी तृप्ती भोईर यांचे पक्षात स्वागत करत, त्यांच्या अनुभवाचा आणि कार्यशैलीचा भाजपला आगामी निवडणुकीत निश्चितच फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला. कल्याण-डोंबिवली परिसरात सुरू असलेल्या पक्षांतराच्या सत्रात हा आणखी एक महत्त्वाचा राजकीय घडामोड म्हणून पाहिली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com