Eknath Shinde with Shiv Sena leaders amid post-BMC election political developments in Mumbai Saam Tv
मुंबई/पुणे

मुंबईच्या महापौरपदासाठी रस्सीखेच, एकनाथ शिंदे मोठा डाव टाकणार, 'हॉटेल पॉलिटिक्स' सुरू

Eknath Shinde Keeps Councillors In Hotel For Three Days: मुंबई महापालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदेंनी मोठा राजकीय डाव टाकला आहे. शिवसेनेच्या सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांना 3 दिवस हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Omkar Sonawane

मुंबई महापालिकेवर प्रथमच भाजपचा महापौर होण्याचे संकेत
एकनाथ शिंदेंचा नगरसेवकांसाठी हॉटेलमध्ये मुक्कामाचा निर्णय
फोडाफोडी टाळण्यासाठी कडक सुरक्षा आणि मार्गदर्शन सत्र
शिंदे गटाच्या हालचालींमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा

भाजपने सर्वाधिक 29 पैकी 25 महापालिकेवर झेंडा फडकवत मोठा इतिहास रचला आहे. अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबईमध्ये ठाकरे बंधुना देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दणका दिला आहे. तर एकनाथ शिंदे यांना 29 जागा मिळाल्या तर ठाकरे बंधूंना 71 जागा मिळाल्या आहेत. मनसेच्या पदरात यावेळी देखील निराशाच आली. कुठलाही प्रचार न करता कॉंग्रेसने 23 जागा मिळावल्या. तर अजित पवार 3 आणि शरद पवारांना 1 अवघी 1 जागा मिळाली.

विशेष म्हणजे पहिल्यांदाच मुंबई महापालिकेवर भाजपचाच महापौर होईल. भाजपचा महापौर होण्याचे संकेत असताना आता एकनाथ शिंदे यांनी मोठा डाव टाकला आहे. शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे सर्व नगरसेवक आता पुढील 3 दिवस हॉटेलमध्ये राहणार आहे.

यादरम्यान सर्व नगरसेवकांना एकनाथ शिंदे आणि प्रमुख नेते मार्गदर्शन करतील. नगरसेवकांची फोडाफोडी होऊ नये, यामुळे एकनाथ शिंदे यांनी सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला. बांद्राच्या ताज लँडमध्ये सर्व नगरसेवकांना ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्व नगरसेवक आता 3 दिवस हॉटेलमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

इतकेच नाही तर कडक सुरक्षेत नगरसेवकांना ठेवण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नगरसेवकांना अशाप्रकारे हॉटेलमध्ये एकत्र आणि कडक सुरक्षेत ठेवल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत महापौरपदासाठी शिंदेंची फिल्डिंग? शिंदेंना हवंय मुंबईचं महापौरपद?

Maharashtra Live News Update: पेण खोपोली मार्गावरील एचपी इंटरनॅशनल कंपनीत भीषण आग

धर्मनिरपेक्ष पक्षांना एमआयएमचा धक्का, राज्यात थेट 125 जागांवर मुसंडी,कोणत्या महापालिकेत एमआयएमचा डंका?

Maharashtra Politics: शरद पवार गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा राजीनामा, महापालिकेतील पराभव जिव्हारी लागला

अमेरिका इराणवर एअर स्ट्राईक करणार?अवकाशात घोंगावतायत अमेरिकेची विमानं

SCROLL FOR NEXT