Viral Video : हॉटेल रूमसाठी ऑनलाइन बुकिंग करताना चुकीची लिंक क्लिक झाली; तरुणीसोबत असं काही घडलं की ढसाढसा रडली, पाहा VIDEO

Raipur Online Fraud Viral Video News : ऑनलाईन हॉटेल बुकिंग करताना चुकीच्या लिंकवर क्लिक केल्याने तरुणीच्या खात्यातील लाखो रुपये सायबर ठगांनी चोरले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
Viral Video : हॉटेल रूमसाठी ऑनलाइन बुकिंग करताना चुकीची लिंक क्लिक झाली; तरुणीसोबत असं काही घडलं की ढसाढसा रडली, पाहा VIDEO
Raipur Online Fraud Viral Video NewsSaam Tv
Published On
Summary
  • हॉटेल बुकिंग करताना चुकीच्या लिंकवर क्लिक केल्याने फसवणूक

  • बनावट वेबसाईट आणि कॉलद्वारे पैसे उकळले

  • तरुणीने सायबर क्राईममध्ये तक्रार दाखल केली

  • व्हायरल व्हिडिओमुळे ऑनलाईन सावधगिरीचा इशारा

मोबाईलवर सतत काहीतरी स्क्रोल करत राहणं हा प्रकार तरुणाईमध्ये वाढत आहे. त्यामुळे मोबाईल स्क्रीनिंगचा टाईम देखील वाढत आहे. मोबाईल जितका चांगला तितकाच तो जीवघेणा देखील आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे सध्याच्या जगात जलद पद्धतीच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. त्यातीलच एक म्हणजे ऑनलाईन व्यवहार. एखादा ऑनलाईन व्यवहार करताना आपण सावधगिरीने बाळगणं गरजेचं असतं कारण आपली एक चूक आपलं भलंमोठं नुकसान करू शकते. अशाच प्रकारची धक्कादायक एक घटना रायपूरमध्ये घडली आहे. हॉटेलचं बुकिंग करताना चुकीच्या लिंकवर क्लिक केल्याने तरुणीच्या खात्यातील लाखो रुपये सायबर ठग्यांनी चोरले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तरुणीने व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे, ती रायपूरमधील मायरा हॉटेलच बुकिंग करत होती. यासाठी तीने गुगलवर मायरा हॉटेलची लिंक ओपन केली. मात्र तिला जरा देखील कल्पना नव्हती की तीने जर चुकीच्या लिंकवर क्लिक केलं तर तिची फसवणूक होऊ शकते. ती म्हणाली कि, तिने बुकिंग करण्यासाठी गुगलवर हॉटेलचं नाव टाकलं. हॉटेलचं नाव टाकताच एक लिंक समोर आली. त्या लिंकवर तिने क्लिक केलं.

Viral Video : हॉटेल रूमसाठी ऑनलाइन बुकिंग करताना चुकीची लिंक क्लिक झाली; तरुणीसोबत असं काही घडलं की ढसाढसा रडली, पाहा VIDEO
EPFO News : नोकरी सोडली किंवा गेली तर पीएफ खात्यात व्याज जमा होतो का? ईपीएफओने स्पष्टच सांगितले

बुकिंग दरम्यान, ऐश्वर्याकडून सुरुवातीला १२,१०० मागितले गेले होते, ज्यामध्ये खोलीच्या भाड्यासाठी ₹१२,००० आणि कोणत्याही अतिरिक्त शुल्कासाठी ₹१०० समाविष्ट होते. कोणताही विचार न करता तिने रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर केली. पेमेंट केल्यानंतर काही वेळातच, तिला एक फोन आला ज्यामध्ये तिला कळवले गेले की पेमेंटमध्ये गडबड झाली आहे आणि बुकिंग कन्फर्म करण्यासाठी तिला आणखी १२,००० पाठवावे लागतील. तिला असेही आश्वासन देण्यात आले की तिने पूर्वी पाठवलेली रक्कम परत केली जाईल.

कॉलवरच्या माणसावर डोळे बंद ठेवून विश्वास ठेवत तरुणीने कोणताही प्रश्न विचारला नाही. मात्र काही वेळानंतर तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. तसेच ज्या नंबरवरून ऐश्वर्याला कॉल आला होता तो नंबर अचानक बंद झाला आणि वेबसाइट किंवा तिचे ईमेल प्रतिसाद देत नव्हते. घाबरून ऐश्वर्याला मायरा रिसॉर्टची मूळ वेबसाइट सापडली आणि तिने दिलेल्या अधिकृत नंबरवर कॉल केला. तिला मिळालेला प्रतिसाद आणखी धक्कादायक होता.

Viral Video : हॉटेल रूमसाठी ऑनलाइन बुकिंग करताना चुकीची लिंक क्लिक झाली; तरुणीसोबत असं काही घडलं की ढसाढसा रडली, पाहा VIDEO
Municipal Election : प्रचारावेळी पैसे वाटपावरून दोन्ही राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस भिडले; सांगलीत जोरदार राडा

रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले की त्यांच्या नावाने अनेक बनावट वेबसाइट कार्यरत आहेत आणि त्यांना यापूर्वीही अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या तक्रारी मिळाल्या होत्या. तथापि, जेव्हा ऐश्वर्याने त्यांच्या कृतींबद्दल विचारपूस केली तेव्हा तिला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यावरून हे स्पष्ट झाले की या प्रकारची फसवणूक बऱ्याच काळापासून सुरू होती, तरीही ती थांबवण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली गेली नव्हती.

Viral Video : हॉटेल रूमसाठी ऑनलाइन बुकिंग करताना चुकीची लिंक क्लिक झाली; तरुणीसोबत असं काही घडलं की ढसाढसा रडली, पाहा VIDEO
Municipal Election : "आमचं ठरलंय! कमळाऐवजी कपाट चिन्ह..." केडीएमसी निवडणुकीत सोशल मीडियावर खोडसाळ प्रचार, नेमकं प्रकरण काय?

पैसे गमावल्यानंतर, ऐश्वर्याने ताबडतोब सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार दाखल केली आणि स्थानिक सायबर सेलमध्ये एफआयआर देखील दाखल केला. तिने संपूर्ण प्रकरण पुराव्यांसह अधिकाऱ्यांना कळवले आहे जेणेकरून टोळीला पकडता येईल. अशा प्रकरणांमध्ये पैसे वसूल करणे अनेकदा कठीण असले तरी, तिने आशा सोडलेली नाही. त्यानंतर ऐश्वर्याने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये तिने घडलेली आपबिती सविस्तरपणे सांगितली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com