Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे म्हणाले देवाच्या मनात असेल तर...., फडणवीस म्हणाले मी देवा का?

Devendra Fadnavis Criticized Uddhav Thackeray: देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिश्किल टोला लगावला.
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे म्हणाले देवाच्या मनात असेल तर...., फडणवीस म्हणाले मी देवा का?
Devendra Fadnavis Criticized Uddhav ThackeraySaam Tv
Published On

Summary -

  • उद्धव ठाकरेंच्या महापौरसंदर्भातील वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण

  • महापौर पदाबाबत भाजप-शिवसेना एकत्र बसून निर्णय घेणार

  • विरोधी पक्षांवर फडणवीसांची जोरदार टीका

'देवाच्या मनात असेल तर आमचा महापौर होईल', असं सूचक विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. उद्धव ठाकरेंच्या मुंबईच्या महापौरसंदर्भातील या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत मिश्किल टोला लगावला. 'देवा कुठला मी का वरचा देव', असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंना उत्तर दिलं. यावेळी त्यांनी 'मनसेला जास्त यश मिळेल असं मला आधीच वाटलं नव्हतं. या युतीचा राज ठाकरे यांना फटका बसला आहे आणि उद्धव ठाकरे यांना फायदा झाला आहे.', असे देखील फडणवीस म्हणाले.

शिवसेना- भाजप महापौरपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 'आम्ही बसून हे ठरवणार आहोत. महापौर कोण?, महापौर किती वर्षे? हे सर्व मी आणि शिंदे आणि दोन्ही कडचे नेतेमंडळी आम्ही ते बसून ठरवू. काही त्यामध्ये वाद होणार नाही. छान पद्धतीने आम्ही दोन्ही पक्ष मुंबई चालवून दाखवू.'

Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे म्हणाले देवाच्या मनात असेल तर...., फडणवीस म्हणाले मी देवा का?
BMC Election: मुंबईतील 25 वर्षांची सत्ता भाजपनं उलथवली; दोन्ही ठाकरे बंधूंचा करिष्मा का कमी पडला?

शिवसेनेला मुंबईत म्हणावे तसे यश मिळाले नाही त्यामुळे भाजपला अडचण झाली का? यावर मुख्यमंत्री म्हणाले, 'मी असे म्हणणार नाही. त्यांच्याही खूप जागा कमी मतांनी गेल्या आहेत. या सगळ्या निवडणुकीमध्ये मुंबईत पहिल्यांदा ते ही अशापद्धतीने निवडणूक लढवत होते. त्या मानाने त्यांना चांगले यश मिळाले. अपेक्षा जास्त होती पण काही थोड्या मतांनी जागा गेल्या.'

Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे म्हणाले देवाच्या मनात असेल तर...., फडणवीस म्हणाले मी देवा का?
BMC MNS Result : मुंबईत मनसेचे ६ नगरसेवक, ठाकरेंच्या घरी विजयी शिलेदारांचं औक्षण, पाहा VIDEO

मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधी पक्षांवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, 'महाराष्ट्राने यावेळी ठरवले होते की जे मोदींसोबत आम्ही त्यांच्यासोबत. त्यामुळे भाजप नंबर १ चा पक्ष बनला आणि आमच्यासोबत जे युतीमध्ये होते त्यांना देखील जनतेने चांगले मतदान केले. महाराष्ट्र यावेळी मोदींसोबत, भाजपसोबत आणि महायुतीसोबत होता. काँग्रेस किंवा कुठलाही पक्ष असो यांना महाराष्ट्रातील जनतेने धडा शिकवला.' तसंच, 'विरोधी पक्ष राहणार की नाही हे विरोधी पक्षाला विचारले पाहिले. विरोधक झाल्यानंतर विरोध म्हणून भूमिका घ्यावी लागते. घरी बसून विरोधी पक्ष होत नाही.', असे देखील फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis: उद्धव ठाकरे म्हणाले देवाच्या मनात असेल तर...., फडणवीस म्हणाले मी देवा का?
CM Devendra Fadnavis: माझ्या बोटावरची शाई पुसत नाही, राज ठाकरेंच्या आरोपावर CM फडणवीसांचे उत्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com