Pune Politics: पुण्याची आर्ची झाली नगरसेविका, एमबीएचं शिक्षण सोडून थेट राजकारणात

Pune Corporation Election Result 2026: पुणे महानगर पालिका निवडणुकीत अनेक तरुण उमेदवार विजयी झाले. पुण्याची आर्ची नगरसेविका झाली. एमबीएचं शिक्षण सोडून तिने थेट राजकारणात एन्ट्री केली.
Pune Politics: पुण्याची आर्ची झाली नगरसेविका, एमबीएचं शिक्षण सोडून थेट राजकारणात
Anjali OraseSaam Tv
Published On

Summary -

  • पुण्यातील सर्वात कमी वयाची नगरसेविका ठरली अंजली ओरसे

  • ‘पुण्याची आर्ची’ म्हणून प्रभागात ओळख

  • एमबीए शिक्षण अर्धवट सोडून थेट राजकारणात एन्ट्री

  • पुढील काळात शिक्षण पूर्ण करण्याचाही निर्धार

सागर आव्हाड, पुणे

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत पुणेकर नागरिकांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला असून महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता आहे.दुसरीकडे महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक प्रचार केलेला असताना देखील अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे.अस असताना प्रभाग क्रमांक ७ मध्ये 'पुण्याची आर्ची' अशी ओळख असलेल्या अंजली ओरसे हिने विजय मिळवलं असून पुण्यातील सर्वात कमी वयाची नगरसेविका अशी तिची ओळख झाली आहे.

पुण्यातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अंजली ओरसे ही विजयी झाली असून वयाच्या २३ व्या वर्षी ती नगरसेविका झाली आहे.अंजली हिच एमबीए च शिक्षण सुरू असताना वडिलांनी तिला राजकारणात यायचं सांगितल आणि तिने तिचं शिक्षण अर्धवट सोडलं आणि तिने निवडणुकीची तयारी सुरू केली.प्रभागात फिरत असताना आर्ची म्हणून झालेली ओळख आणि नागरिकांचे जाणून घेतलेले प्रश्न आत्ता तिला सोडवायचे असल्याच तिचं म्हणणं आहे.

Pune Politics: पुण्याची आर्ची झाली नगरसेविका, एमबीएचं शिक्षण सोडून थेट राजकारणात
Pune Results : आंदेकरांचा तुरूंगातूनही दबदबा, धंगेकरांच्या पत्नीचा दारूण पराभव, प्रभाग २३ मध्ये नेमकं काय झालं?

याबाबत अंजली ओरसे म्हणाली की, 'माझ्या प्रभागातील जनतेच मी खूप आभार मानते की माझ्या सारख्या तरुणीवर त्यांनी विश्वास दाखवला आहे.माझ्यासाठी हे नवीन असून माझ्या वडिलांनी तसेच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी जे विश्वास माझ्यावर दाखवलं आहे त्यामुळे मी सर्वात तरुण म्हणून आज राजकारणात आले आहे.मला माझ्या प्रभागामधील नागरिकांच्या ज्या समस्या आहे त्या सोडवायचे आहे.आमच्या इथ गोरगरीब कष्टकरी खूप राहत असून इथ पाणी, रस्ते तसेच आरोग्याच्या समस्या असून त्या मला सोडवायचे आहे. तसेच महिला सुरक्षेतेचा मुद्दा देखील खूप महत्वाच असून प्रभात सीसीटीव्ही तसेच जे डिजिटल फसवणुकीचे प्रकार घडत आहे त्याबाबत देखील मला काम करायचं असल्याचं तिने सांगितलं.

Pune Politics: पुण्याची आर्ची झाली नगरसेविका, एमबीएचं शिक्षण सोडून थेट राजकारणात
Pune Politics: घड्याळाची 'वेळ' चुकली, पवारांची युती फसली; पुणे आणि पिंपरी हातातून गेलं

तसंच, ती पुढे म्हणाली की, 'माझं बँकिंग आणि फायनान्स मध्ये एमबीए च शिक्षण सुरू होत आणि या दरम्यान माझे वडील म्हणाले की तुला निवडणूक लढवायची आहे आणि मगं मी ते अर्धवट सोडलं आणि निवडणुकीची तयारी सुरू केली.आत्ता मला राहिलेलं शिक्षण देखील पूर्ण करायचं आहे.'

Pune Politics: पुण्याची आर्ची झाली नगरसेविका, एमबीएचं शिक्षण सोडून थेट राजकारणात
Pune Result: नातीगोती- महिला राज, सर्वाधिक मताधिक्य; तर कुठे शहराध्यक्षांचे पराभव, पुणे महापालिकेच्या निकालाचे A टू Z अपडेट्स

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com