महानगरपालिकेच्या राजकारणात GEN-Z चा दमदार प्रवेश, 22 वर्षाच्या तरुण नगरसेवकांकडून नव्या युगाची सुरुवात

Gen Z Leaders In Pune Municipal Corporation: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत जनरेशन झेडमधील तरुण नगरसेवकांचा दमदार प्रवेश झाला आहे. 22 वर्षीय अंजली ओरसे यांच्यासह तरुण नेतृत्वाने नव्या युगाची नांदी दिली आहे.
Anjali Orse, one of Pune’s youngest corporators, celebrates her historic victory from Gokhalenagar ward.
Anjali Orse, one of Pune’s youngest corporators, celebrates her historic victory from Gokhalenagar ward.Saam Tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकांनी यंदा शहराच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू केला आहे. जनरेशन झेडमधील (GEN-Z) तरुण उमेदवारांनी या निवडणुकीत ठसा उमटवत थेट नगरसेवकपदाची जबाबदारी स्वीकारली असून, त्यांच्या रेझ्युमेमध्ये आता नगरसेवक हा मानाचा शब्द जोडला गेला आहे. पारंपरिक राजकारणापेक्षा वेगळी दृष्टी, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि थेट नागरिकांशी संवाद ही या तरुण नेतृत्वाची प्रमुख ओळख ठरत आहे.

Anjali Orse, one of Pune’s youngest corporators, celebrates her historic victory from Gokhalenagar ward.
Pune Result: नातीगोती- महिला राज, सर्वाधिक मताधिक्य; तर कुठे शहराध्यक्षांचे पराभव, पुणे महापालिकेच्या निकालाचे A टू Z अपडेट्स

राष्ट्रवादीच्या 22 वर्षीय अंजली ओरसे

भाजपच्या 22 वर्षीय सई थोपटे आणि सिद्धी शिळीमकर, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या 25 वर्षीय यश साने हे या निवडणुकीतील लक्षवेधी विजयी उमेदवार ठरले आहेत. नागरी समस्या सोडवण्यासाठी आधुनिक उपाययोजना, प्रशासनात पारदर्शकता आणि डिजिटल माध्यमांचा वापर या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला आहे

Anjali Orse, one of Pune’s youngest corporators, celebrates her historic victory from Gokhalenagar ward.
'मराठी'आणि 'मराठी माणसाला' कधीच एकटं पडू देणार नाही, हा शब्द आहे ठाकरेंचा

पुण्यातील प्रभाग क्रमांक सात गोखलेनगर वाकडेवाडी मधून अंजली ओरसे विजयी झाली. प्रभागनिहाय कचरा प्रक्रिया प्रकल्प, अखंड पाणीपुरवठा, पाईपद्वारे गॅस कनेक्शन, संवेदनशील भागात सीसीटीव्ही कॅमेरे, सरकारी इमारतींमध्ये सौर ऊर्जेचा वापर आणि नागरिकांशी नियमित संवाद अशा अनेक उपक्रमांचा समावेश आहे. एमबीएचे शिक्षण घेत असलेली अंजली गोखले नगर भागात आरची म्हणून प्रसिद्ध आहे. नगरसेवक म्हणून काम करतानाच शिक्षण सुरू ठेवण्याचा मानस व्यक्त करतात.

Anjali Orse, one of Pune’s youngest corporators, celebrates her historic victory from Gokhalenagar ward.
Navi Mumbai Result: नवी मुंबईत भाजपची एकहाती सत्ता, कोणत्या वॉर्डमधून कोण जिंकले? वाचा विजयी उमेदवारांची यादी

तरुणांच्या समस्या मला जवळून माहित आहेत आणि गेल्या काही वर्षांत मी वॉर्डमध्ये सातत्याने काम केले आहे, असे त्या सांगतात. जे सायबर फ्रॉड होत आहेत त्यासाठी मी एक सेंटर मतदारसंघात उभारणार असल्याचं तिने सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com