

मुंबई महापालिकेच्या १६१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर
काँग्रेस, शिवसेना आणि आरपीआयच्या वर्चस्वाला पूर्णविराम
भाजपने ९० पार जागा जिंकत ऐतिहासिक मुसंडी
मुंबई महापालिकेच्या 161 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपचा महापौर होणार आहे. आणि त्याचाच हा आहे विजयी जल्लोष. मुंबईत भाजपनं ठाकरेसेनेचा धुव्वा उडवत जोरदार मुसंडी मारलीय. मात्र आधी जनसंघ, आणि त्यानंतर भाजपच्या स्थापनेनंतर भाजपनं जंग जंग पछाडलं. तरीही भाजपला मुंबई महापालिका जिंकता येत नव्हती. काँग्रेस, शिवसेनाच नाही तर आरपीआयनेही मुंबईचं महापौरपद पटकावलं होतं. मात्र आता भाजपनं 90 पार मुसंडी मारलीय. मात्र मुंबईत भाजप रुजण्याचा प्रवास नेमका कसा होता? पाहूयात.
1980- रामदास नायकांचा मुंबईत भाजप रुजवण्याचा प्रयत्न
1984- हिंदूत्वाच्या मुद्द्यावर मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेना युती
1984- महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या सहाय्यान पाय रोवण्यास सुरुवात
1984- महापालिका निवडणुकीत भाजप 13 तर शिवसेनेचे 74 नगरसेवक विजयी
1988-89 - हिंदूत्ववादी मतांचं विभाजन टाळण्यासाठी प्रमोद महाजन यांच्याकडून युतीचे प्रयत्न
1992 नंतर 2012 पर्यंत महापालिका निवडणुकीत भाजपला विशेष यश नाही
2017- भाजप, शिवसेना स्वबळावर लढल्यानंतर भाजपची 82 तर शिवसेना 84 जागांवर मुसंडी
खरंतर हिंदूत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून शिवसेनेसोबत युती केलेला भाजप बाळासाहेब ठाकरे हयात होते तोपर्यंत नेहमी दुय्यम भुमिकेत पाहायला मिळाला. या काळात भाजपला शेठजी भटजींचा पक्ष म्हटलं जायचं. याच दरम्यान भाजपनं उत्तर भारतीय हिंदूत्ववादी मतांसोबत मराठी नेत्यांची फळी तयार करायला सुरुवात केली. तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर भाजपनं मुंबईत आणखी जोर लावला. आणि त्यामुळेच 2017 च्या महापालिका निवडणुकीत भाजपने 31 जागांवरुन थेट 82 जागांवर मुसंडी मारली.
एवढंच नाही तर 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी साथ सोडल्यानंतर इरेला पेटलेल्या भाजपनं त्यांच्या शिवेसनेची दोन शकलं केली.. आणि एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं.. आता त्याच एकनाथ शिंदेंच्या साथीनं उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी आणि काही प्रमाणात मराठी मतांसह मुंबईत सर्वाधिक जागा पटकावल्या आहेत.. त्यामुळे भाजपच्या महापौरपदाचा मार्ग मोकळा झालाय..त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचं अभिनंदन केलंय.
भाजपचं यश हे निश्चितच निर्विवाद आहे. मात्र भाजपला महाराष्ट्रात रुजवण्यासाठी शिवसेनेनं सहकार्य केलं होतं. आता त्याच शिवेसेनेला भाजपनं धक्का दिलाय. असं असलं तरी आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपच सत्तेत आल्यानं भाजपची जबाबदारी वाढलीय, हे मात्र निश्चित.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.