Pune News Saam Tv
मुंबई/पुणे

Ganeshotsav Pune : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दोन दिवशी दारूची दुकाने राहणार बंद

Pune News : पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने गणेशोत्सवाच्या आगमन आणि विसर्जन दिवशी संपूर्ण पुणे जिल्ह्यात दारूबंदी लागू केली आहे. पाचव्या आणि सातव्या दिवसाच्या विसर्जन मिरवणूक मार्गावरची दुकानेही बंद राहणार आहे.

Alisha Khedekar

  • गणेशोत्सवाच्या आगमन व विसर्जन दिवशी संपूर्ण पुणे जिल्ह्यात दारूबंदी लागू.

  • २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान खडक, विश्रामबाग आणि फरासखाना हद्दीत विशेष ताकीद.

  • पाचव्या आणि सातव्या दिवसाच्या विसर्जन मिरवणूक मार्गावरील दुकाने बंद ठेवण्याचे आदेश.

  • आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई होणार.

गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील अतिशय महत्त्वाचा सण असून, पुणे जिल्हा हा गणेशभक्ती आणि गणेशोत्सवासाठी विशेष ओळखला जातो. लाखो गणेशभक्त या काळात गणपती बाप्पाचे स्वागत करतात, मिरवणुका काढतात आणि उत्साहात सहभागी होतात. अशा पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांची सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांचा विचार करून एक मोठा निर्णय घेतला आहे. गणरायाच्या आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी तसेच विशिष्ट मिरवणूक मार्गांवर पुणे जिल्ह्यात "ड्राय डे" म्हणजेच दारूबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, २७ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन होत आहे आणि ६ सप्टेंबरला गणपती विसर्जन होणार आहे. या दोन्ही दिवशी संपूर्ण पुणे जिल्ह्यात दारूची विक्री, साठवणूक तसेच वाहतूक यावर पूर्णतः बंदी राहील. या आदेशामुळे गावोगाव, शहरात आणि ग्रामीण भागात कोणत्याही प्रकारचे दारूचे दुकान, बार, वाइन शॉप किंवा हॉटेलमधील दारू विक्री सुरू ठेवणे कडक मनाई असेल.

याशिवाय, पुणे शहरातील खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीत येणाऱ्या सर्व दारू विक्रेत्यांना २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या संपूर्ण कालावधीत विशेष सक्त ताकीद देण्यात आली आहे. या भागात गणेशोत्सवाच्या मिरवणुका मोठ्या प्रमाणावर काढल्या जातात. गर्दी आणि उत्साहाच्या वातावरणात अप्रीतिकर घटना घडू नयेत यासाठी ही दारूबंदी लागू केली जात आहे.

तसेच, पुण्यातील पाचव्या आणि सातव्या दिवसाच्या विसर्जन मिरवणुकांच्या वेळी मिरवणूक मार्गावरील सर्व दारू विक्रीची आस्थापने बंद ठेवण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मिरवणुका देशभर प्रसिद्ध असून, हजारो भाविक या ठिकाणी एकत्र येतात. त्यावेळी नागरिकांची सुरक्षितता, शिस्त आणि शांती टिकवण्यासाठी या बंदीला विशेष महत्त्व आहे.

गणेशोत्सव काळात अनेकदा नशेच्या अवस्थेत वाद, गोंधळ किंवा कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी ही दारूबंदी अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पोलिस दलालाही या काळात सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या विरोधात प्रशासनाकडून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Festivals: दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत; वाचा मुहूर्त, वार आणि तारीखसह सणांची यादी

Maharashtra Politics: निवडणुकीआधीच महायुतीत संघर्ष? शिंदेंच्या खात्यावर फडणवीस नाराज?

Shocking: प्रियकराची सटकली, प्रेयसीच्या तोंडात कोंबली स्फोटकं; स्फोटानंतर चेहरा झाला छिन्नविछन्न

Pune: गणेशोत्सवात पुण्यात ७००० पोलिस तैनात, एआय कॅमेऱ्याची असणार नजर; २७ ऑगस्ट अन् ६ सप्टेंबर 'ड्राय डे' घोषित

Atharva Sudame: पुरोगामी महाराष्ट्राची सामाजिक अधोगती

SCROLL FOR NEXT