
मुंबईमध्ये कामानिमित्त राहणारे चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाण्यास सुरूवात झाली आहे. रेल्वे, एसटी, प्रायव्हेट गाड्यांच्या माध्यमातून ते कोकणामध्ये आपल्या गावी जात आहेत. अशामध्ये गणेशभक्तांचा कोकण प्रवास सुकर करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने विशेष तयारी केली आहे. एसटी महामंडळाकडून गणेशभक्तांसाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून देत आहे. लातूर जिल्ह्यातून २०० लालपरी बस मुंबईत दाखल होत असून यामुळे यंदाचा गणेशभक्तांचा प्रवास आणखी आरामदायक होणार आहे.
लालपरी बस मुंबईत दाखल होऊ लागल्या आहेत. शहरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी या बसेस उलवे–करंजाडे रस्त्यावर उभ्या करण्यात आल्या. शनिवारी संध्याकाळपर्यंत सुमारे २०० बस येथे पोहोचल्या होत्या. या बसांच्या नियंत्रणाची जबाबदारी पनवेल डेपो व्यवस्थापक ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तर विद्याविहार डेपोचे अधिकारीही मदतीसाठी तैनात आहेत.
एसटी बस चालक आणि कर्मचाऱ्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था पनवेल डेपोमध्ये करण्यात आली आहे. ग्रुप बुकिंग असलेल्या या बसेस रविवारी सकाळपासून मुंबईतील विविध उपनगरांमध्ये प्रवाशांना घेऊन जाणार आहेत. त्यामुळे गणेशभक्तांचा मुंबई–कोकण प्रवास अधिक सुखकारक होणार आहे. नवी मुंबईच्या आधारावर केलेले हे नियोजन पहिल्यांदाच लागू करण्यात आले असून त्यामुळे हजारो गणेशभक्तांना दिलासा मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.