Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीबाबत मोठा निर्णय, मानाच्या ५ गणपती मंडळानंतर 'ही' २ मंडळं मिरवणुकीत होणार सहभागी

Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीबाबत आज महत्वाची बैठक पार पडला. या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आला. मानाच्या ५ गणपती मंडळानंतर २ गणेशोत्सव मंडळं मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.
Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीबाबत मोठा निर्णय, मानाच्या ५ गणपती मंडळानंतर ही २ मंडळं मिरवणुकीत होणार सहभागी
Pune GaneshotsavSaam Tv
Published On

Summary -

  • पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत २ मंडळ नव्याने सहभागी होणार आहेत.

  • चंद्रग्रहणाआधी सर्व विसर्जन पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

  • ढोल पथकांची संख्या कमी करण्याचा निर्णय.

  • वेळेत मिरवणूक पूर्ण करण्यासाठी मंडळांची बैठक.

अक्षय बडवे, पुणे

गणेशोत्सवापूर्वीच पुण्यातील वैभवशाली विसर्जन मिरवणुकीच्या बाबत अनेक चर्चा आणि निर्णय घेण्यास गणेश मंडळांनी सुरुवात केली आहे. २७ ऑगस्ट रोजी गणेशोत्सवाला सुरुवात होत असून ६ सप्टेंबर रोजी अनंतचतुर्दशी आहे. या विसर्जन मिरवणुकीबाबत आज महत्वाचा निर्णय घेण्यात आला. मानाच्या ५ गणपती मंडळानंतर २ गणेशोत्सव मंडळं मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.

यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यातील मानाचे पाच गणपतींची मिरवणूक मार्गस्थ झाल्यानंतर त्यांच्या मागे अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी या दोन गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. मानाच्या पाच गणपतींमध्ये शेवटचा म्हणजेच मानाचा पाचवा कसबा गणपती मार्गस्थ होताच ही दोन्ही गणेशोत्सव मंडळं मुख्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार असल्याची घोषणा आज मंडळांच्या अध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेत केली.

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीबाबत मोठा निर्णय, मानाच्या ५ गणपती मंडळानंतर ही २ मंडळं मिरवणुकीत होणार सहभागी
Pune ST Bus : एसटी बस कंडक्टरवर जीवघेणा हल्ला, लोखंडी रोडने मारहाणीचा प्रयत्न; पुण्यात भयंकर घडलं

अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी यावेळी सांगितले की, '७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३७ वाजता चंद्रग्रहण सुरू होत आहे. हिंदू धर्म शास्त्रानुसार, ग्रहण काळात देवतांच्या मूर्ती झाकून ठेवाव्या लागतात. त्यामुळे त्यावेळेच्या आधी म्हणजेच दुपारी १२ वाजण्यापूर्वी सर्व गणेशमूर्तींचे विसर्जन पूर्ण होणे अत्यावश्यक आहे.'

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीबाबत मोठा निर्णय, मानाच्या ५ गणपती मंडळानंतर ही २ मंडळं मिरवणुकीत होणार सहभागी
Pune News: पुणेकरांनो आज पाणी जपून वापरा, शहरातील 'या' भागात कमी दाबाने पाणी पुरवठा

अण्णा थोरात यांनी पुढे सांगितले की, 'सर्व गणेश मंडळांनी आपली विसर्जन मिरवणूक रविवारी दुपारी १२ वाजण्यापूर्वी संपवावी. मिरवणुकीसाठी नेमलेल्या पथकांची संख्या शक्य तितकी कमी ठेवावी जेणेकरून वेळेचा अपव्यय होणार नाही. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळाच्या बाबत आम्हाला कुठला ही वाद नाही, कदाचित त्यांच्या आधी आम्ही जाऊ.' तसंच, आम्ही मानाचे गणपती मंडळ यांना सुद्धा त्यांच्या मिरवणुकीत असणारे ढोल पथकांच्या संख्येबाबत चर्चा करणार असल्याची माहिती थोरात यांनी दिली.

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीबाबत मोठा निर्णय, मानाच्या ५ गणपती मंडळानंतर ही २ मंडळं मिरवणुकीत होणार सहभागी
Pune Traffic: १ ऑगस्टला पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, शहरातील अनेक रस्ते बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com