Ahmedabad Plane Crash Saam tv
मुंबई/पुणे

Ahmedabad Plane Crash : मेहनतीने आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं, पण नियतीने घात केला; डोंबिवलीतील क्रू मेंबर रोशनीचा मृत्यू

Ahmedabad Plane Crash update : रोशनीने मेहनतीने आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. मात्र, नियतीने तिचा घात केला. डोंबिवलीतील क्रू मेंबर रोशनीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख, साम टीव्ही

गुजरातच्या अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर 27 वर्षीय रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती. रोशनीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

रोशनी ही डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील नव उमीया कृपा सोसायटीमध्ये आपल्या आई-वडिल आणि भाऊ सोबत राहत होती. रोशनीचे वडील राजेंद्र, आई राजश्री आणि भाऊ विघ्नेश एकत्रच डोंबिवलीत राहत होते. मुंबई ग्रँडरोड परिसरात राहणारे सोनघरे कुटुंब दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत स्थायिक झालं होतं. रोशनीचा भाऊ एका खासगी शिपिंग कंपनीमध्ये काम करतो. तर आई-वडील हे घरीच असतात. रोशनीचे शिक्षण मुंबईत झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र सोनघरे आणि त्यांचे पत्नी राजश्री हिने आपल्या दोन्ही मुलांना शिकवले.

रोशनीनला लहानपणापासूनच एअर क्रू बनायचं होतं. रोशनीने जिद्द आणि मेहनत करत तिचे स्वप्न पूर्ण केलं. काल आई-वडिलांचा निरोप घेऊन ती अहमदाबादला गेली. अहमदाबादच्या फ्लाईटने ते लंडनच्या दिशेने निघाली होती, मात्र याच विमानाचा अपघात झाला. या अपघातात रोशनीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, रोशनीच्या वडिलांना तिच्या नातेवाईकांना गुरुवारी ७ वाजण्याच्या सुमारास बातमी कळली. तिचे वडील आणि तिचा भाऊ हे अहमदाबादला गेले आहेत. तर तिच्या आईला अद्याप याबाबत काहीच माहीत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात विजांच्या गडगडाटासह भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी...

Nirmala Nawale: पुण्याच्या प्रसिद्ध सरपंचबाईंच्या घरी गणरायाचं आगमन, PHOTO पाहा

Marathi Actor Death: ज्येष्ठ मराठी अभिनेते काळाच्या पडद्याआड; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Akot Heavy Rain : बळीराजावर संकट! अकोल्याच्या पुंडा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस; शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

'Bigg Boss 19'चा पहिला कॅप्टन ठरला, गौरव खन्ना अन् बसीर अलीच्या भांडणात 'या' सदस्याने मारली बाजी

SCROLL FOR NEXT