Ahmedabad Plane Crash : लंडनमधील मुलाला भेटायची इच्छा राहिली अपूर्ण; सांगोल्याची दाम्पत्याचा विमान अपघातात मृत्यू, दोन मुले पोरकी

Ahmedabad Plane Crash update : सांगोल्याची दाम्पत्याचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने दोन मुले पोरकी झाली. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ पसरली आहे.
Ahmedabad Plane Crash
Ahmedabad Plane Crash update Saam tv
Published On

Airport plane crash : गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरून लंडनला निघालेल्या विमानाच्या अपघाताने हाहाकार माजला आहे. या अपघातात 204 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. अपघातात मृत पावलेल्या लोकांमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांचाही समावेश आहे. मुलाकडे लंडनला निघालेल्या सांगोल्याचील दाम्पत्याचाही विमान अपघाता मृत्यू झाला आहे. दोघांच्या मृत्यूने त्यांची दोन मुले पोरकी झाली.

अहमदाबाद विमानतळावरून लंडनला निघालेल्या विमानाचा भीषण अपघात झाला. विमान टेक ऑफ घेताच काही मिनिटांत अपघात झाला. प्रवाशांनी भरलेलं विमान निवासी डॉक्टरांच्या इमारतीवर कोसळलं. विमान अपघातात इमारतीमधील एमबीबीएसच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तर २०० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १०० हून अधिक प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश आहे. सांगोल्यातील दाम्पत्याचाही मृत्यू झाला आहे.

अहमदाबाद विमान अपघातात मूळचे सांगोला तालुक्यातील हातिद गावातील पवार दांपत्याचाही समावेश आहे. महादेव पवार ( वय ६७) आणि आशा पवार ( वय ५५) अशी दोघांची नावे आहेत. लंडनमध्ये त्यांचा मुलगा व्यावसायिक आहे. मुलाकडे जाण्यासाठी विमानाने प्रवास करत होते. त्यांचा दुसरा मुलगा अहमदाबाद येथे व्यवसाय करत आहे. दोघांच्या आकस्मिक जाण्याने दोन्ही मुलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मुंबईतील को-पायलट सुमित सभरवाल यांचा अपघाती मृत्यू

अहमदाबाद विमान दुर्घटनेतील को पायलेट सुमित सभरवाल यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. सुमित यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुंबईतील पवई परिसरामध्ये सुमित सभरवाल यांचे 88 वर्षाचे वडील एकटेच राहतात. टेकऑफ करण्यापूर्वी सुमितने त्यांच्याशी संवाद साधला होता.

Ahmedabad Plane Crash
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातातील 100 हून अधिक मृतदेह बाहेर काढले; आकडा वाढण्याची शक्यता, भारतीयांवर दु:खाचा डोंगर

लंडनमध्ये विमान लँड झाल्यावर मी पुन्हा बोलेन, असं त्यांनी सांगितलं होतं. पण त्या आधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. सुमित यांच्या पाश्चात त्याची बहीण आणि दोन भाचे असा परिवार आहे. त्याच्या बहिणीला ही माहिती मिळताच ती दिल्लीहून सुमितच्या मुंबईला घरी पोहोचली. त्यानंतर सुमितचे वडील आणि बहीण मुंबई विमानतळावरून गुजरातकडे रवाना होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com