Ahmedabad Plane Crash : ...तर प्रवाशांचा जीव वाचला असता; अपघाताच्या २ तासांआधीच मिळाले होते संकेत; दुर्घटनेआधीचा व्हिडिओ समोर

Ahmedabad Plane Crash update : अहमदाबाद विमानतळावरुन लंडन निघालेल्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात काही प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघाताचा आधीचा व्हिडिओ आलाय.
Ahmedabad Plane Crash
Ahmedabad Plane Crash update : Saam tv
Published On

Ahmedabad Plane Crash: गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावहून लंडनला निघालेल्या विमानाचा भयंकर अपघात झाला. २३० प्रवासी आणि १२ क्रूमेंबरसहित विमान लंडनला निघालं होतं. दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावरून विमान गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावर लँड झालं. त्यानंर हे विमान लंडनला निघालं. मात्र, अहमदाबाद विमानतळावरून लंडनला निघालेल्या विमान टेक ऑफ घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत कोसळलं. ही दुर्घटना होण्याआधी एक प्रवाशाला काही असामान्य बाबी आढळल्या. या प्रवाशाने ट्विट करून माहिती दिली आहे.

अहमदाबादवरून लंडनला जाणारं एअर इंडियाचं एआय-१७१ विमानानं दुपारी १.३८ वाजता टेक ऑफ घेतलं. बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान टेक ऑफनंतर अवघ्या काही मिनिटात कोसळलं. विमान अवघ्या पाच मिनिटांत कोसळल्याची माहिती मिळत आहे. या विमानात एकूण २३० प्रवासी होते. त्यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे. तसेच १२ क्रू मेंबर देखील होते. प्रवाशांनी भरलेलं विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळलं. या हॉस्टेलमधील काही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अपघाताची कुणकुण एका प्रवाशाला आधीच लागली होती. या प्रवाशाने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.

प्रवासी आकाश वात्सा याने ट्विट करत म्हटलं की, 'मी दोन तासांपूर्वी याच विमानात होतो. मी दिल्ली विमानतळावरून अहमदाबाद विमानतळावर पोहोचलो. या विमानात मला असामान्य बाबी आढळल्या. मी विमानाचा व्हिडिओ काढला. त्यानंतर ट्विट केलं'.

Ahmedabad Plane Crash
Air India Flight crash : २४२ प्रवासी, लंडनसाठी टेक ऑफ घेताच १० मिनिटांत कोसळलं; नेमका अपघात कसा झाला?

प्रवासी आकाश यांनी व्हिडिओ शेअर केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर शंका उपस्थित केल्या आहेत. सीट समोरील एसी सुरु होत नसेल, तर त्याचा विमान अपघाताशी काय संबंध आहे? असा सवाल काही नेटकऱ्यांनी उपस्थित केले आहेत. तर या प्रकरणाची चौकशी करायला हवी, असे काहींनी म्हटलं आहे. तांत्रिक बिघाडाची माहिती आधीच कळाली असती, तर प्रवाशांचा जीव वाचला असता, असेही बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com