Family members of the victim demand justice as wife alleges murder linked to illegal construction complaints in Dombivli. saam tv
मुंबई/पुणे

प्रताप चौधरी हत्या प्रकरणाला वेगळं वळण! तक्रारी केल्यामुळेच पतीची हत्या... पत्नीचा महापालिकेवर गंभीर आरोप

Dombivli Killed Case Illegal Construction Complaint Reason: डोंबिवलीतील प्रताप चौधरी हत्या प्रकरणाला नवे वळण लागले असून अनधिकृत बांधकामाविरोधातील तक्रारीमुळेच पतीची हत्या झाल्याचा गंभीर आरोप पत्नीने केला आहे.

Omkar Sonawane

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याण: काही दिवसांपूर्वी डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात झालेल्या प्रताप चौधरी यांच्या हत्येप्रकरणी नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी रोहित शेलार याला पोलिसांनी अटक केली असली, तरी मृत प्रताप चौधरी यांच्या पत्नी नेहा चौधरी यांनी केडीएमसी प्रशासन आणि पोलिसांवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे.

नेहा चौधरी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दावा केला की, परिसरातील अनधिकृत बांधकामाबाबत त्यांच्या पतीने वारंवार तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींमुळेच त्यांची हत्या करण्यात आली. संबंधित बांधकामाविरोधात केडीएमसीकडे (KDMC) अनेकदा लेखी तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही, असा आरोप त्यांनी केला. केडीएमसीने वेळेत कारवाई केली असती, तर माझे पती आज जिवंत असते, असे भावनिक वक्तव्य करत नेहा चौधरी यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

तसेच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी रोहित शेलारला मदत करणाऱ्या इतर व्यक्तींचीही चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, त्यांच्या पासून मला व माझ्या मुलीला जीविताचा धोका आहे.त्यामुळे त्यांचेवर सुद्धा अटकेची कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. या गंभीर आरोपांमुळे केडीएमसी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हत्या प्रकरणाच्या तपासासोबतच अनधिकृत बांधकामाच्या तक्रारींचीही चौकशी होण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

नेमके प्रकरण काय?

डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात 29 मे रोजी घर बांधण्याच्या वादातून शेजाऱ्याने शेजाऱ्याची केल्याची घटना घडली होती. घर बांधण्याच्या कारणावरून सुरू असलेल्या वादातून रोहित शेलारने प्रताप चौधरी यांच्यावर घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला केला होता. या हल्ल्यात प्रताप चौधरी गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. घटनेनंतर आरोपी रोहित शेलार हा फरार झाला होता. मात्र, पोलिसांनी त्याचा शोध घेतला आणि नंतर त्याची रवानगी जेलमध्ये करण्यात आली. आता यामध्ये प्रताप चौधरी यांच्या पत्नीने थेट कल्याण डोंबिवली महापालिकेवरच गंभीर आरोप केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT