रक्तरंजीत थरार! मुलाचा जन्मदात्या बापावर चाकूने सपासप वार, ठाण्यात खळबळ

Son Stabbed Father In Mumbra Viral Video Full Details: ठाण्यातील मुंब्रा परिसरात मुलाने स्वतःच्या वडिलांवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून आरोपी फरार आहे.
A shocking incident in Thane’s Mumbra area where a son allegedly stabbed his father following a heated argument, leaving him critically injured.
A shocking incident in Thane’s Mumbra area where a son allegedly stabbed his father following a heated argument, leaving him critically injured.saam tv
Published On

विकास काटे, साम टीव्ही

ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात नातेसंबंधांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. सम्राट नगरमध्ये एका मुलाने स्वतःच्या वडिलांवर चाकूने हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

A shocking incident in Thane’s Mumbra area where a son allegedly stabbed his father following a heated argument, leaving him critically injured.
तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा गैरफायदा; तोतया महिला अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्याला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी वडिलांचे नाव ६५ वर्षीय ख्वाजा शेख असून आरोपी मुलाचे नाव ४५ वर्षीय मोहम्मद शेख आहे. वडील आणि मुलामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संतापाच्या भरात मुलाने वडिलांच्या मानेवर चाकूने वार केले. या हल्ल्यात ख्वाजा शेख गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या जखमेवर अनेक टाके घालण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

A shocking incident in Thane’s Mumbra area where a son allegedly stabbed his father following a heated argument, leaving him critically injured.
Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांच्या विमानात तांत्रिक बिघाड, राजकीय वर्तुळात खळबळ

दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये मुलगा वडिलांवर निर्घृणपणे हल्ला करताना स्पष्ट दिसत आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडल्याचे सांगितले जात आहे. घटनेनंतर आरोपी मोहम्मद शेख फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकारामुळे सम्राट नगर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

A shocking incident in Thane’s Mumbra area where a son allegedly stabbed his father following a heated argument, leaving him critically injured.
Pune Crime : व्यावसायिक तरुणीच्या हत्येनं पुण्यात खळबळ; पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, धक्कादायक कारण उघड

एक मुलगा स्वतःच्या वडिलांवर इतक्या क्रूरपणे हल्ला कसा करू शकतो? कौटुंबिक वाद इतक्या टोकाला जाण्यामागे नेमकं कारण काय? असा प्रश्न नागरिक विचारत आहे. या सर्व घटनेमुळे स्थानिक परिसरात खळबळ उडाली असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com