Beed Crime: बीड हादरले! सासरच्यांकडून विवाहितेची हत्या, डोक्यावर धारदार शस्त्राने वार करत संपवलं; नंतर मृतदेह विहिरीत फेकला

Woman body found in well Beed: बीडमध्ये विवाहितेची निर्घृण हत्या करण्यात आली. सासरच्यांनी डोक्यात धारदार शस्त्राने वार करत संपवलं. नंतर मृतदेह विहिरीत फेकून दिला. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली.
Beed Crime: बीड हादरले! सासरच्यांकडून विवाहितेची हत्या, डोक्यावर धारदार शस्त्राने वार करत संपवलं; नंतर मृतदेह विहिरीत फेकला
Beed CrimeSaam Tv
Published On
  • बीडमध्ये २३ वर्षीय विवाहितेची सासरच्यांकडून हत्या

  • मृतदेह विहिरीत फेकून दिला

  • शवविच्छेदन अहवालातून हत्या झाल्याचे उघड

  • पोलिसांनी २ जणांना अटक केली

योगेश काशिद, बीड

बीडच्या कुटेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी एका विहिरीत २३ वर्षीय विवाहितेचा मृतदेह आढळून आला होता. विवाहितेच्या डोक्यात गंभीर जखमा दिसून आल्या होत्या. या विवाहितेने आत्महत्या केली की तिची हत्या झाली याचा तपास पोलिसांकडून सुरू होता. या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली. सासरच्यांनीच महिलेच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या केली त्यानंतर तिचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. याप्रकरणी हत्या झालेल्या विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पती, सासरा आणि सासू यांच्याविरोधात पिंपळनेर पोलिस ठाण्यात हत्येचा आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, संध्या किसन घुले असं हत्या झालेल्या विवाहितेचे नाव होते. २० मे २०२२ रोजी कुटेवाडी येथील पवन आसाराम कुटे याच्याशी संध्याचा विवाह झाला होता. लग्नात ४ लाख रुपये हुंडा आणि एक तोळा सोने देऊनही लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्यांनी तिचा मानसिक छळ सुरू केला. 'तू काळी आहेस. तुला स्वयंपाक येत नाही. पांढऱ्या पायाची आहेस.', असे म्हणत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सासरच्यांकडून सुरू होता. तर माहेरून ऑटो रिक्षा घेण्यासाठी २ लाख रुपये आणण्याचा तगादा संध्याच्या सासरच्यांनी लावला होता.

Beed Crime: बीड हादरले! सासरच्यांकडून विवाहितेची हत्या, डोक्यावर धारदार शस्त्राने वार करत संपवलं; नंतर मृतदेह विहिरीत फेकला
Sangli Crime: शेतजमिनीसाठी एकमेकांच्या जीवावर उठले, २ गटात लोखंडी रॉड अन् काठ्यांनी बेदम मारहाण

सासरच्या छळाला कंटाळून संध्या ३ महिने माहेरी आली होती. परंतू दीड वर्षांच्या मुलासाठी समजूत काढून संध्याला पुन्हा सासरी पाठवण्यात आले. याच दरम्यान ८ जून रोजी संध्याची चप्पल घराजवळील विहिरीजवळ आढळून आली. सासरच्या लोकांनी माहेरच्या मंडळींना याची कल्पना दिली. यावेळी विहिरीत शोध घेतला असता संध्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. तिचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालातून तिची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले. तिच्या डोक्याच्या मध्यभागी आणि बाजूला धारदार शस्त्राने वार केलाच्या गंभीर जखमा आढळून आल्या. तसेच हातापायावरही जखमा होत्या.

Beed Crime: बीड हादरले! सासरच्यांकडून विवाहितेची हत्या, डोक्यावर धारदार शस्त्राने वार करत संपवलं; नंतर मृतदेह विहिरीत फेकला
Pune Crime : व्यावसायिक तरुणीच्या हत्येनं पुण्यात खळबळ; पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, धक्कादायक कारण उघड

संध्याची हत्या झाल्याचे कळातच तिचे कुटुंबीय संतप्त झाले. आपल्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी संध्याच्या आई-वडिलांनी केली. त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत या प्रकरणी तिच्या सासरच्यांविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत संध्याचा नवरा आणि सासऱ्याला अटक केली. तर तिची सासू फरार आहे पोलिस तिचा शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वी असाच प्रकार गेवराईत समोर आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळामुळे विवाहितेचा बळी गेल्याने न्यायाची प्रतीक्षा पीडित कुटुंब करत आहेत.

Beed Crime: बीड हादरले! सासरच्यांकडून विवाहितेची हत्या, डोक्यावर धारदार शस्त्राने वार करत संपवलं; नंतर मृतदेह विहिरीत फेकला
Pune Crime: खून, दरोडा आणि चोरी! तब्बल ११९ गुन्हे दाखल असलेल्या गुंडासह तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, उधळला दरोड्याचा कट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com