

पुणे गुन्हे शाखेने दरोड्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक केली.
अजयसिंग दुधानी या आरोपीवर महाराष्ट्रात 119 गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी 3 गावठी पिस्तूल, 4 जिवंत काडतुसे आणि धारदार शस्त्रे जप्त
पुण्याच्या गुन्हे शाखा विभागाने मोठी कारवाई करत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक केली आहे. यात महाराष्ट्रात तब्बल ११९ गुन्हे दाखल असलेल्या अजयसिंहला पकडण्यात पोलिसांना यश आले आहेत. पोलिसांनी ३ गावठी पिस्तूल, ४ जिवंत काडतुसे, कोयते आणि इतर धारधार शस्त्रसाठा जप्त केला आहे. अजयसिंग अर्जुनसिंग दुधानी, रामजितसिंग रणजितसिंग टाक, अभयसिंग सिंकदरसिंग जुन्नी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून रोजी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे युनिट ६ चे पोलिस कॉम्बिंग ऑपरेशन राबवत असताना त्यांना मांजरी भागात एक चारचाकी वाहन संशयास्पदरित्या उभे असल्याचे निदर्शनास आले. वाहनाजवळ जाऊन चौकशी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला तोच, वाहनातील व्यक्तींनी गाडीतून उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यातील तीन आरोपींना ताब्यात घेतलं. उर्वरीत व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन तिथून पळून गेले.
पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतल्यावर त्यांना तुम्ही एवढ्या उशिरा येथे काय करीत आहात असे विचारले असता ते उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागले. संशय वाढल्याने पोलिसांनी गाडीची झडती घेतली. तेव्हा त्यांच्या गाडीमधून एक गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे तसेच ६ धारदार शस्त्रे,दरोड्यासाठी लागणारे साहित्य असा ६ लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता संबंधित आरोपी हे दरोडा टाकण्याच्या तयारीत होते असं निष्पन्न झालंय.
या आरोपींची गुन्हे रेकॉर्डची पडताळणी केली असता यातील आरोपी अजयसिंग दुधानी याच्यावर राज्यातील विविध पोलीस ठाण्यात तब्बल ११९ गंभीर गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं. यातील इतर दोन आरोपींवर सुद्धा ६ गुन्हे दाखल आहेत. आता पुण्यातील मांजरी पोलिस ठाण्यात तिघांवर आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.