Sangli Crime: शेतजमिनीसाठी एकमेकांच्या जीवावर उठले, २ गटात लोखंडी रॉड अन् काठ्यांनी बेदम मारहाण

Sangli farm land dispute latest news: सांगलीमध्ये जमिनीच्या वादातून रक्तरंजित थरार घडला. दोन गट आमने-सामने आले. लोखंडी रॉड आणि काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.
Sangli Crime: शेतजमिनीसाठी एकमेकांच्या जीवावर उठले, २ गटात लोखंडी रॉड अन् काठ्यांनी बेदम मारहाण
Sangli Crime Saam Tv
Published On
  • सांगलीत शेतजमिनीच्या समाईक रस्त्यावरून दोन गटांमध्ये तुफान हाणामारी

  • लोखंडी रॉड आणि काठ्यांनी एकमेकांना मारहाण

  • या हाणामारीत दोन जण गंभीर जखमी झाले

  • वादादरम्यान वाहनांची तोडफोड करण्यात आली

विजय पाटील, सांगली

सांगलीमध्ये शेतजमिनीच्या समाईक रस्त्यावरून दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रस्त्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठून लॉखंडी रॉड आणि काठ्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली. या हाणामारीमध्ये दोन जण गंभीर जखमी झाले. या घटनेदरम्यान वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या आरगमधील शंकर भोसले आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील पृथ्वीराज किनेकर यांची आरगमध्ये एकमेकांच्या शेजारी शेतजमीन आहे. दोघांमध्ये समाईक रस्त्यावरून गेल्या काही दिवसांपासून वादावादीचा प्रकार सुरू आहे. बुधवारी पोलिस बंदोबस्तात रस्त्याची मोजणी होणार होती.

त्यापूर्वी पृथ्वीराज किनेकर त्यांच्या शेतात गेले होते. त्यावेळी पृथ्वीराज किनेकर आणि शंकर भोसले यांच्यात वादावादीचा पुन्हा प्रकार घडला. हा वाद ऐवढा वाढला की ते एकमेकांच्या जीवावर उठले.

Sangli Crime: शेतजमिनीसाठी एकमेकांच्या जीवावर उठले, २ गटात लोखंडी रॉड अन् काठ्यांनी बेदम मारहाण
Pune Crime : व्यावसायिक तरुणीच्या हत्येनं पुण्यात खळबळ; पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, धक्कादायक कारण उघड

या वादानंतर शंकर भोसले यांनी पृथ्वीराज किनेकर यांच्या डोक्यात लोखंडी रॉड आणि काठीने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच त्यांना अडविण्यासाठी पृथ्वीराज यांची मेहुणी आली असता त्यांनाही मारहाण करण्यात आली.

यानंतर पृथ्वीराज किनेकर यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेप्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Sangli Crime: शेतजमिनीसाठी एकमेकांच्या जीवावर उठले, २ गटात लोखंडी रॉड अन् काठ्यांनी बेदम मारहाण
Crime: अनैतिक संबंधातून महिलेचे भयंकर कृत्य, ७ महिन्याच्या मुलाची गळा दाबून हत्या नंतर...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com