Kalyan Crime Saam Tv
मुंबई/पुणे

Dombivli Crime: माझ्या मुलीकडे का बघतो? जाब विचारल्याने पोरीच्या वडिलांना मारलं, मद्यधुंद तरुणांचा हैदोस; VIDEO व्हायरल

Dombivli Police: डोंबिवलीमध्ये मद्यधुंद तरुणांनी तुफान राडा केला. माझ्या मुलीकडे का बघतो? जाब विचारल्याने मुलीच्या वडिलांना, काका आणि भावाला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Priya More

Summary -

  • डोंबिवली पश्चिमेत मद्यधुंद तरुणांचा हैदोस

  • मुलीकडे पाहिल्याचा जाब विचारल्याने वडिलांवर हल्ला

  • या मारहाणीत तिघे जण जखमी झाले आहेत

  • या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली

डोंबिवलीमध्ये मारहाणीची भयंकर घटना घडली. खेळत असलेल्या मुलीकडे का बघता?, असा जाब विचारल्याच्या कारणावरून मद्यधुंद तरुणांनी तिघांना मारहाण केली. या मारहाणीत मुलीचे वडील मंगेश पाटील, महेश पाटील आणि त्यांचा पुतण्या साई पाटील जखमी झाले आहेत. ही घटना डोंबिवली पश्चिमेतील विजयनगर परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सध्या तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विजयनगर परिसरात काही तरुण मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालत होते. यावेळी खेळत असलेल्या मुलीकडे संशयास्पद नजरेने का पाहत आहे असा जाब मुलीच्या वडिलांनी विचारला. याचाच राग मनात धरून संबंधित तरुणांनी अचानक मुलीच्या कुटुंबीयांवर हल्ला केला. मुलीच्या कुटुंबातील तिघांना मारहाण केली. ही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात तानाजी, आदित्य आणि त्यांच्या इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. परिसरात अशा प्रकारच्या गुंडगर्दीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे हादरले! पत्नीची निर्घृण हत्या करून पतीनेही संपवले आयुष्य; कारण वाचून पायाखालील जमीन सरकेल

Tuljabhavani Temple: तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय; आता व्हीआयपी दर्शन बंद, काय आहे नेमका नियम?

दुधाचा की कोरा? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? Black Tea Vs Milk Tea Benefits

Maharashtra News Live Update: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

SCROLL FOR NEXT