Mumbai - Pune News Saam tv
मुंबई/पुणे

Shocking News : पिकनिक स्पॉटवर अपघाताचं सत्र सुरुच; भिमाशंकरमध्ये दोघांचा कुंडात बुडून मृत्यू, वसईत एक विहिरीत बुडाला

Mumbai - Pune News : भिमाशंकरजवळील देवकुंड धबधब्यात दुर्दैवी घटना घडली असून, डॉक्टर सुबोध करंडे आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे स्थानिक दिलीप वनघरे या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. वसईतही १७ वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू झाला आहे.

Alisha Khedekar

  • देवकुंड धबधब्यात डॉक्टर आणि स्थानिक तरुणाचा बुडून मृत्यू

  • दिलीप वनघरे यांनी डॉक्टरांना वाचवताना गमावला जीव

  • वसईत १७ वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू

  • अशा घटनांना रोखण्यासाठी सुरक्षा उपायांची गरज अधोरेखित

पुण्यातील भिमाशंकरजवळील भिवेगाव येथील प्रसिद्ध देवकुंड धबधब्यात दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सहा डॉक्टरांच्या टीमसह फिरायला आलेले सुबोध करंडे हे धबधब्याच्या परिसरात भटकंती करत असताना पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकले. तोल जाऊन ते खोल पाण्यात ओढले गेले आणि स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करूनही ते बाहेर पडू शकले नाहीत. अचानक घडलेल्या या घटनेने त्यांच्या सहकाऱ्यांसह उपस्थित पर्यटकांमध्ये खळबळ उडाली.

घटनेदरम्यान स्थानिक तरुण दिलीप वनघरे यांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेतली. मात्र, पाण्याचा जोरदार प्रवाह, खोल दरीसारखा पाणथळ भाग यामुळे त्यांनाही जीव वाचवणे शक्य झाले नाही. काही क्षणांतच दोघेही पाण्याखाली अदृश्य झाले. ही घटना पाहून नागिरीकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

स्थानिक नागरिकांनी आणि पर्यटकांनी मिळून तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. दोऱ्यांचा वापर करून आणि उपलब्ध साधनांनी पाण्यात शोध सुरू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. काही तासांच्या प्रयत्नांनंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, याच दिवशी वसईच्या धुमाळ नगर भागात आणखी एक दुर्दैवी घटना घडली. १७ वर्षीय समशूल खान हा आपल्या ४-५ मित्रांसह पोहण्यासाठी स्थानिक विहिरीवर गेला होता. सर्व मित्र पोहून बाहेर आले, मात्र समशूल बाहेर आला नाही. मित्रांनी सुरुवातीला स्वतः शोधण्याचा प्रयत्न केला, पण अपयश आल्यावर त्यांनी तात्काळ पोलीस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली.

या घटनांनी पर्यटकांनी आणि स्थानिकांनी पाण्याजवळ सावधगिरी बाळगण्याची गरज पुन्हा अधोरेखित केली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात जाणे जरी आनंददायी असले, तरी त्यातील जोखमींकडे दुर्लक्ष केल्यास त्या क्षणात आयुष्य बदलून टाकणाऱ्या दुर्दैवी घटना घडू शकतात, याची जाणीव या दोन्ही अपघातांनी करून दिली आहे.

देवकुंड धबधब्यात नेमकी काय घटना घडली?

डॉक्टर सुबोध करंडे पाण्याच्या जोरदार प्रवाहात अडकून बुडाले. त्यांना वाचवण्यासाठी स्थानिक दिलीप वनघरे पाण्यात उतरले, परंतु दोघांचाही मृत्यू झाला.

दिलीप वनघरे कोण होते?

दिलीप वनघरे हे भिवेगावचे स्थानिक रहिवासी असून, त्यांनी जीवाची पर्वा न करता डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

वसईत काय दुर्दैवी घटना घडली?

वसईच्या धुमाळ नगरात १७ वर्षीय समशूल खान विहिरीत पोहण्यासाठी गेला होता, परंतु तो बुडून मृत झाला.

अशा घटनांना आळा घालण्यासाठी काय करता येईल?

धोकादायक पाण्याच्या ठिकाणी सुरक्षा उपाययोजना, चेतावणी फलक, लोखंडी जाळी बसवणे आणि पोहण्यावर बंदी हे उपाय आवश्यक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT