Dhanshri Shintre
मुंबई ते भीमाशंकर हे अंतर सुमारे 210 ते 220 किमी आहे. गाडीने प्रवास केल्यास 6-7 तास लागतात, त्यामुळे वेळ आणि साधन आधी ठरवा.
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेने खोपोलीमार्गे, तिथून कर्जत - माळशेज घाट - घाटघर - भीमाशंकर असा मार्ग निवडा.
मुंबईहून पुणे किंवा कर्जतला ट्रेनने जा. तिथून पुढे बस किंवा स्थानिक टॅक्सीने भीमाशंकर गाठता येते.
मुंबईच्या दादर, ठाणे किंवा कल्याण एसटी डेपोवरून पुणे, मंचर किंवा घोडगावसाठी बस मिळते. तिथून पुढे स्थानिक गाडीने जाता येते.
मंचर किंवा घोडगावपासून भीमाशंकरपर्यंत खासगी जीप किंवा बसने जावे लागते. हा टप्पा घाटातून जात असल्याने थोडा वेळ लागतो.
पावसाळ्यात घाट रस्ता निसरडा असतो. त्यामुळे वाहन चालवताना विशेष दक्षता घ्या. ट्रेकर्ससाठीही ही वेळ चढाईसाठी कठीण असू शकते.
हे बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. त्यामुळे गर्दी असते, विशेषतः श्रावण महिन्यात आणि महाशिवरात्रीला खूप गर्दी असते.
मार्गात हॉटेल्स व ढाबे मिळतात. पण घाटात गेल्यावर खाण्याच्या सुविधा कमी होतात, त्यामुळे पाण्याची बाटली आणि हलकी खाद्यपदार्थ सोबत ठेवा.