Dhanshri Shintre
पुणे स्टेशनवरून कोल्हापूर (छ. शाहू महाराज टर्मिनस) साठी नियमित रेल्वे सेवा उपलब्ध आहे. अंदाजे वेळ 6-7 तास लागू शकतात.
पुणे स्टेशन किंवा स्वारगेट बस स्थानकावरून कोल्हापूरसाठी एसटी बस सुटतात. प्रवासाचा कालावधी साधारणतः 6 ते 8 तास लागतात.
पुण्याहून NH48 मार्गे थेट कोल्हापूरकडे प्रवास करता येतो. अंतर सुमारे 230-240 कि.मी. आणि वेळ सुमारे 5-6 तास लागतात.
कोल्हापूरपासून ज्योतिबा मंदिर 18 ते 20 किमी अंतरावर आहे – शहरातून मंदिराकडे जाण्यासाठी तुम्ही स्थानिक वाहतूक (ऑटो, कॅब किंवा जीप) घेऊ शकता.
काही भाविक कोल्हापूरहून पायी ज्योतिबा गड चढतात. साधारण 3-4 तास लागतात.
खाजगी वाहनांनी गेलेल्या भाविकांसाठी मंदिराजवळ पार्किंगची व्यवस्था आहे.
मंदिरात प्रवेशासाठी कोणताही ड्रेस कोड नाही, पण भक्तांनी पारंपरिक पोशाख घालणे. दर्शनासाठी मंदिर सकाळी लवकर उघडते आणि संध्याकाळी बंद होते.