वसई-विरार शहरात सकाळपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असून त्यामुळे शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे अनेक सखल भाग जलमय झाले असून रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले आहे.शाळकरी मुलं, नोकरदार वर्ग आणि नागरिकांना या पावसात मोठ्या अडचणींचा सामना करत प्रवास करावा लागत आहे. काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याची स्थिती आहे.
या परिसरात साचलेल्या दुषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. महानगरपालिका, पोलिस प्रशासन या ठिकाणी कुठे सर्तक असल्याचे दिसत नाही.मात्र पावसाचा जोर ओसरेल, तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात येणं कठीण असल्याचं चित्र दिसून येत आहे. हवामान खात्यानं पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानं नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.