CM Naveen Patnaik And CM Eknath Shinde Saam TV
मुंबई/पुणे

MNS News: ओडिशाप्रमाणे कंत्राटी कामगार पद्धत बंद करुन कामगारांना कायमस्वरुपी कामावर घ्या; मनसेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

MNS Demand to CM Eknath Shinde: या निर्णयानुसार आस्थापनांना कामगार भरती करताना कामगारांना कायम कामगार म्हणूनच भरती करावं लागणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे, मुंबई

MNS Demand to CM Eknath Shinde: ओडिशाप्रमाणे महाराष्ट्रातही कंत्राटी कामगार पद्धत बंद करावी आणि कामगारांना कायमस्वरुपी कामावर घ्यावे अशी मागणी मनसेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष डॉ. मनोज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ही मागणी पत्राद्वारे केली आहे.

कंत्राटी कामगार (Contract Base Employee) असणे म्हणजे आधुनिक गुलामगिरीत असण्यासारखेच आहे असं या पत्रात म्हटलं आहे. ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी त्यांच्या राज्यात कंत्राटी कामगार पद्धत बंद केली, आपल्या राज्यातही ही पद्धत बंद व्हावी आणि कामगारांना कायम कामगारांप्रमाणे सोयी सुविधा मिळाव्या अशी मागणी मनसेने केली आहे. (MNS Latest News)

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार (MNS) सेनेचे अध्यक्ष डॉ. मनोज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना याबाबत पत्र लिहीत ही मागणी केली आहे. आपल्या पत्रात चव्हाण यांनी लिहीलं की, ओडिशा राज्यातील नविन पटनायक यांच्या सरकारने कामगारांच्या हिताचा अत्यंत क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आस्थापनांना कामगार भरती करताना कामगारांना कायम कामगार म्हणूनच भरती करावं लागणार आहे. ज्यामुळे कामगारांची कंत्राटी कामगार पद्धतीच्या जाचातून सुटका होणार आहे.

मुळातच कायम स्वरुपाचे काम करत असलेल्या कामगाराला २४० दिवस काम केल्यावर कायम कामगार म्हणून सामील करून घ्यावे असा कायदा आहे. परंतु सर्व आस्थापना आपल्या सोयीनुसार कामगारांना २४० दिवस पूर्ण होण्याआधी सर्व्हिस ब्रेक देतात व कायद्याला बगल देतात. ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री नविन पटनायक यांनी ओडिशा राज्यात कंत्राटी कामगार पद्धत कायमची बंद झाली असे जाहीर करताना याच दिवसाची आतूरतेने वाट पाहत होतो असे उद्गार काढले आहेत. (Maharashtra News)

या निर्णयामुळे ओडिशा राज्यातील ५७,०००/- हून अधिक कामगारांना कायम करुन घेण्यात येणार आहे. आपल्या राज्यातही कंत्राटी कामगार पद्धतीच्या आड कामगारांची पिळवणूक होत आहे. आपणांस नम्रतापूर्वक विनंती करतो की, या निर्णयाचा विचार करुन आपल्या राज्यातील कंत्राटी पद्धत काढून मोठ्या संख्येने असलेल्या कंत्राटी कामगारांना दिलासा द्यावा. जेणेकरुन या कामगारांना देखील कायम कामगारांप्रमाणे सोयी-सुविधांचा लाभ घेता येईल. असं पत्र मनसेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लिहीलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ISRO Recruitment: इस्त्रोमध्ये नोकरीची संधी; पगार १.७७ लाख रुपये; पात्रता काय? वाचा सविस्तर

IND vs AUS : विराटसोबत ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच असं झालं, कुणाला विश्वासही बसणार नाही

Calcium Deficiency: शरीरात कॅल्शियम कमी असल्यास कोणती गंभीर लक्षणे दिसतात? जाणून घ्या

Thackeray Shivsena News : ठाकरेंच्या शिवसेना नेत्याला जीवे मारण्याची धमकी, गुंडाच्या त्या कृत्यामुळे कल्याणमध्ये संताप, वाचा नेमकं काय घडलं?

Shrutz Haasan Photos: कपाळी टिकली अन् कातील नजर, साऊथच्या अभिनेत्रीने केले तरूणांना घायाळ

SCROLL FOR NEXT