संजय गडदे, मुंबई
Andheri East By-Poll: निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा (Election 2022) प्रचार मंगळवारी सायंकाळी सहा वाजता संपणार आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराची धामधुम आज थांबणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी येत्या तीन नोव्हेंबरला मतदान होणार असून निवडणुकीच्या रिंगणातील सातही उमेदवारांकडून आता छुप्या प्रचारावर भर दिला जाणार आहे. (Andheri Latest News)
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या अंधेरी (Andheri) पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. ठाकरे गटाच्या उमेदवाराचा नोकरीचा राजीनामा मंजूर न करण्यासाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर इथपासून सुरू झालेला प्रकार, तर लटके यांनी शिंदे गटातून लढावे यासाठी शिंदे गटाकडून झालेला दबाव तंत्र ते ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावे यासाठी विविध राजकीय पक्षांनी भाजपला केलेली विनंती या सगळ्या प्रकारामुळे अंधेरी पोट निवडणुकीत चांगलीच रंगत वाढली.
अखेरीस भाजपच्या अधिकृत उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत असतानाच एकूण सहा अपक्ष उमेदवार मैदानात टिकून राहिल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला नव्यानेच मिळवलेली निशाणी मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घ्यावी लागल. दरम्यानच्या काळातच अपक्ष उमेदवाराकडून राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेना उमेदवार विरोधात वारंवार तक्रारी करत निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केल्या गेल्यामुळे निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असेच चिन्ह दिसू लागले. (Maharashtra News)
येत्या तीन नोव्हेंबरला या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून तब्बल 2 लाख 71 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.यापैकी एक लाख 46 हजार 685 पुरुष मतदार तर एक लाख चोवीस हजार 816 स्त्री मतदार असून एक तृतीय पंथीय मतदाराचा देखील समावेश असणार आहे. 103 मतदार हे अनिवासी असून दिव्यांग मतदारांची संख्या देखील 429 इतकी आहे. सेवाधारक 419 मतदार ८० वर्ष व अधिक वय असणारे 7504 मतदार ईटीपी बी एस 29 मतदार व प्रथमच मतदान करणारे 243 नवतरुण मतदार आपला लोकप्रतिनिधी निवडणार आहेत.
शिवसेना उमेदवाराच्या विरोधात प्रबळ असा कोणताही उमेदवार नसल्यामुळे शिवसेनेने राजकीय सभा गल्लो गल्ली दारोदारी फिरून निशाणी मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे काम झाले. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी ऋतुजा लटके यांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये सहभागी होऊन महा विकास आघाडी मजबुतीने लढत असल्याचा संदेश देखील दिला.समोर तुल्यबळ उमेदवार जरी नसला तरी विरोधकांकडून सोशल माध्यमातून नोटाला मतदान करण्याचे आवाहन आणि अपक्षांना पुरवली जाणारी रसद हे पाहता शिवसेनेच्या वतीने काल अंधेरी येथे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सभेचे देखील आयोजन करण्यात आलं होतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.