रुपाली बडवे, मुंबई
Kishori Pednekar Police Inquiry: मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना दादर पोलिसांनी समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानुसार त्या आज, मंगळवारी चौकशीसाठी हजर झाल्या. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) घोटाळ्याप्रकरणी दादर पोलिसांनी त्याची चौकशी केली. अडीच तास चाललेल्या या चौकशीनंतर किशोरी पेडणेकर या प्रसारमाध्यमांसमोर आल्या आणि आपली भूमिका स्पष्ट केली. (Kishori Pednekar Latest News)
किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या, माझ्यावर आरोप कोणी केलेत एका पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने, माजी खासदाराने केलेत. प्रत्येक आरोपाला उत्तरं दिलीच पाहिजेत याची गरज नाही. ज्यावेळी पोलिसांनी मला चौकशीसाठी बोलावलं त्याचवेळी पोलिसांना सांगितलं पुढचे तीन दिवस मी व्यस्त असेल त्यामुळे येऊ शकत नाही. पण त्यावेळी चुकीची बातमी चालवली गेली की किशोरी पेडणेकर चौकशीला सहकार्य करत नाहीत. आपल्याकडे कर नाही त्याला डर कशाला ही जी म्हण आहे ती मी कायम ठेवते.
ठरल्याप्रमाणे मी चौकशीला आले. अडीच तास चौकशी झाली. तुमच्या घड्याळाप्रमाणे अडीच तास चौकशी झाली हे खरं आहे. अडीच तास चौकशी झाली. मुळात एवढा वेळ ते चौकशी करत नव्हते. सुरुवातीला खूप वेळ तर आमच्या गप्पा झाल्या. त्यानंतर त्यांनी जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची मला जी उत्तर माहिती होती ती मी त्यांना दिलेली आहेत. त्यामुळे ज्या पद्धतीने सर्व प्रकरण रंगवले जाते त्यातील दहा टक्के सुद्धा खरं नाही असा दावा किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. (Maharashtra News)
पुढे त्या म्हणाल्या, व्हॉट्सअप चॅट चा मुद्दा जेव्हा आला, अगदी सर्वच पक्षांचे नेते, मी महापौर या नात्याने सर्वांशीच माझे चांगले संबंध आहेत. या सर्वांचेच व्हॉट्सअप चॅट असतात पण यातील किती चॅट मी पाहिलेत? किती जणांना मी रिप्लाय केलेत? उत्तर दिलेत? हे देखील तपासले गेले पाहिजे. आणि समोरच्या व्यक्तीने जे काही व्हॉट्सअप चॅट दाखवले असतील ते समोरच्या व्यक्तीने केलेले मेसेज आहेत माझ्याकडून त्याला काही रिप्लाय दिलाय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात साप म्हणून दोरी बडवायची हे झालेलं आहे अशी टीकाही त्यांनी केलेली आहे.
यावेळी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलेल्या आरोपांबाबत पेडणेकर म्हणाल्या की, त्या व्यक्तीवर मी बोलणार नाही, त्या माणसावरुन उत्तर देणार नाही. ही आता कायद्याची लढाई सुरू आहे, मी कायद्यानेच त्यांना उत्तर देईल असं त्या म्हणाल्या.
दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी मी त्यांची वेळ मागितली आहे. त्यांची जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी त्यांना भेटण्यासाठी जाईल. मी त्यांना माझं निवेदन देणार आहे. एकनाथ शिंदे हे मूळ सैनिक आहेत. त्यामुळे माझा हक्क आहे त्यांना भेटण्याचा असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.