lection BJP Vs Shivsena  Saam TV
मुंबई/पुणे

Thackeray VS Fadnavis: काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही, उद्धव ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचं प्रत्युत्तर

2019 ते 2022 या मधल्या काळातील त्यांचा शेतकऱ्यांप्रति पोकळ कळवळा महाराष्ट्राने अनुभवलाय आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : शेतकऱ्यांच्या वीजबिलाच्या मुद्द्यावरुन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आमने-सामने आले आहेत.

देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत असताना आणि सत्तेबाहेर असताना वीजबिलाबाबत वेगळी भूमिका घेतली, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर सडकून टीका केली. या टीकेला आता आता फडणवीसांनी जशात तसं उत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा व्हिडीओ आणि महावितरणचं वीजबिल वसुलीबाबतचं पत्र ट्विटरवर शेअर केलं. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं की, काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही. 2019 ते 2022 या मधल्या काळातील त्यांचा शेतकऱ्यांप्रति पोकळ कळवळा महाराष्ट्राने अनुभवलाय आहे.

जे बोलतो ते करतो, फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही. महावितरणचा हा आदेश 22 नोव्हेंबर 2022 रोजीच जारी झालेला आहे.शेतकर्‍यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे, असं देंवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

वीजबिलाबाबत मध्य प्रदेश पॅटर्न राबवण्याची मागणी देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत नसताना केली होती. तो व्हिडीओ दाखवत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधाला. देवेंद्रजी जनाची नाहीतर मनाजी लाज बाळगा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सत्तेत नसताना वेगळी भाषा आणि सत्तेत असताना वेगळी भाषा करता. आज मी सत्तेत नाही, मात्र तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. शेतकर्‍यांचं वीज बील माफ करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT