Uddhav Thackeray Buldhana Speech : राज्यातील राजकारणात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची बुलडाण्यात जाहीर सभा पार पडत आहेत. चिखली येथील शेतकरी मेळाव्यानिमित्त उद्धव ठाकरे राज्यातील राजकीय घडामोडींनंतर प्रथमच शिवसेनेचा (Shivsena) गड समजला जाणाऱ्या विदर्भात आहेत. यावेळी शेतकऱ्यांच्या वीजबिलाच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांनी राज्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) टीकास्त्र सोडलं.
वीजबिलाबाबत मध्य प्रदेश पॅटर्न राबवण्याची मागणी देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत नसताना केली होती. तो व्हिडीओ दाखवत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधाला. देवेंद्रजी जनाची नाहीतर मनाजी लाज बाळगा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सत्तेत नसताना वेगळी भाषा आणि सत्तेत असताना वेगळी भाषा करता. आज मी सत्तेत नाही, मात्र तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. शेतकर्यांचं वीज बील माफ करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल
ज्यांना स्वत:चं भविष्य माहित नाही, ते आपलं भवितव्य ठरवणार अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.आज नवस फेडायला गेलेत काही दिवसांपूर्वी हात दाखवायला गेले होते. ज्यांना स्वत:चं भविष्य माहित नाही, ते आपलं भवितव्य ठरवणार. तुमचं भविष्य ठरवणारे दिल्लीत बसलेत. त्यांनी उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं अशी स्थिती त्यांची आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.
संविधान दिनी काय बोलायचं हा प्रश्न आहे. मात्र संविधान आज सुरक्षित आहे का इथून सुरुवात होते. पुढची वाटचाल आपल्याला लोकशाही वाचवण्यासाठी करावी लागेल. हुकूमशाही आपल्याला नकोय. गद्दारी घालवण्यासाठी जिजाऊंचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय
राज्यातील राजकारणात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची बुलडाण्यात जाहीर सभा पार पडत आहेत. चिखली येथील शेतकरी मेळाव्यानिमित्त उद्धव ठाकरे राज्यातील राजकीय घडामोडींनंतर प्रथमच शिवसेनेचा गड समजला जाणाऱ्या विदर्भात आहेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.