Uddhav Thackeray: शिंदे, फडणवीस, कोश्यारी, भाजप... उद्धव ठाकरेंची चौफेर फटकेबाजी, वाचा भाषणातील ठळक मुद्दे

शेतकर्‍यांचं वीज बील माफ करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना केलं.
Uddhav thackeray
Uddhav thackeraySaam tV
Published On

Uddhav Thackeray Speech: शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray) यांनी आज बुलडाण्यातील चिखली येथील शेतकरी मेळाव्यातून चौफेर फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप यांच्यावर सडकून टीका केली.

देवेंद्रजी जनाची नाहीतर मनाची लाज बाळगा

वीजबिलाबाबत मध्य प्रदेश पॅटर्न राबवण्याची मागणी देवेंद्र फडणवीसांनी सत्तेत नसताना केली होती. तो व्हिडीओ दाखवत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधाला. देवेंद्रजी जनाची नाहीतर मनाजी लाज बाळगा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सत्तेत नसताना वेगळी भाषा आणि सत्तेत असताना वेगळी भाषा करता. आज मी सत्तेत नाही, मात्र तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. शेतकर्‍यांचं वीज बील माफ करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना केलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल

ज्यांना स्वत:चं भविष्य माहित नाही, ते आपलं भवितव्य ठरवणार अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला.आज नवस फेडायला गेलेत काही दिवसांपूर्वी हात दाखवायला गेले होते. ज्यांना स्वत:चं भविष्य माहित नाही, ते आपलं भवितव्य ठरवणार. तुमचं भविष्य ठरवणारे दिल्लीत बसलेत. त्यांनी उठ म्हटलं की उठायचं आणि बस म्हटलं की बसायचं अशी स्थिती त्यांची आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

Uddhav thackeray
Uddhav Thackeray : देवेंद्रजी जनाची नाहीतर मनाची लाज बाळगा; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

शेतकऱ्यांनो आत्महत्या करु नका

पंजाबच्या शेतकरी नमला नाही, मस्तवाल सरकारला त्यांनी झुकवले होते.नांगरात ताकद आहे. नांगरधारी शेतकर्‍याने हुकुमशहाला तेव्हा देखील झुकवले होते, हे विसरू नका. शिवसेना तुमच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरेल परंतु सर्व शेतकर्‍यांनी मला वचन द्या, 'कितीही वाईट वेळ आली तरी आत्महत्या करणार नाही', असं उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं.

संविधान आज सुरक्षित आहे का?

आज शहीद दिन, संविधान दिन. परंतु ते संविधान आज सुरक्षित आहे का? काही दिवस अगोदर प्रकाश आंबेडकरांच्या सोबत होतो. आज देशाची लोकशाही वाचवायची ही सगळ्यांची भावना आहे. संविधान दिनी काय बोलायचं हा प्रश्न आहे. मात्र संविधान आज सुरक्षित आहे का इथून सुरुवात होते. पुढची वाटचाल आपल्याला लोकशाही वाचवण्यासाठी करावी लागेल. हुकूमशाही आपल्याला नकोय.

Uddhav thackeray
Sanjay Raut : 'आज 40 रेडे गुवाहाटीला गेलेत...', शिंदे गटावर संजय राऊतांचा हल्लाबोल

उद्या भाजप महाराष्ट्राचे तुकडे करतील

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान करायचा. गुजरात निवडणुकीसाठी उद्योग तिकडे पाठवत आहेत. काल कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्या राज्यातला गावांवर हक्क सांगत आहेत. पुढल्या वर्षी कर्नाटकची निवडणूक उद्या भाजप महाराष्ट्राचे तुकडे करतील. मिंधे गप्प बसतील. विठोबाला पण कर्नाटकात नेणार, अक्कलकोटचे स्वामी समर्थ तिकडे नेणार. मी मुख्यमंत्री असतांना राज्यपालांचा आगाऊ पणा सहन केला नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com