Pune Saam
मुंबई/पुणे

Pune News: उपचाराअभावी गर्भवती महिलेचा मृत्यू; उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून चौकशीचे आदेश

Deputy CM Ajit Pawar on Pune Hospital Incident: उपचाराअभावी तनिषा भिसे यांचा मृत्यू; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तातडीने चौकशीचे आदेश.

Bhagyashree Kamble

पुणे: नामांकीत दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे तनिषा भिसे या महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला. महिलेच्या उपचारासाठी हॉस्पिटलने आधी १० लाख रूपयांची मागणी केली होती. पैशांच्या हव्यासामुळे उपचारात उशीर झाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप कुटुंबीय आणि नागरिकांनी केला आहे. या अत्यंत गंभीर प्रकरणाची दखल राज्य शासनाने तातडीने घेतली असून, सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

शासनाने घेतली गंभीर दखल

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीने उपचार न मिळाल्याने तनिषा भिसे या महिलेला आपले प्राण गमवावे लागले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे करण्याचे आदेश देण्यात आले आहे", असं पालकमंत्री अजित पवार म्हणालेत.

सखोल चौकशी

या दुर्दैवी घटनेची गांभीर्याने दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतची संपूर्ण माहिती घेतली आहे. "आरोग्य विभागाने तातडीने, पारदर्शक आणि निष्पक्षपणे चौकशी पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. रुग्णालय प्रशासनाने माध्यमांसमोर त्यांचे म्हणणे मांडले असले, तरी शासन या प्रकरणाचा सर्व संबंधित घटकांची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करेल", असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.

कायद्यानुसार कठोर कारवाई

"या घटनेबाबत आंदोलन करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि संघटनांच्या भावना शासनाने समजून घेतल्या आहेत. चौकशीच्या निष्कर्षानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. तसेच अशा घटना भविष्यात घडू नयेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. सर्व नागरिकांनी संयम बाळगावा आणि प्रशासनास सहकार्य करावे", असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT