Breaking News

Kolhapur: "तू माझी मैत्रीण आहेस, काही अडचण आली तर फोन कर"; जबाब घेण्याऱ्या पोलिसाचा प्रताप, छातीला स्पर्श करून..

Police Officer Accused of Touching Minor Girl: अल्पवयीन मुलीचा जबाब घेण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने तिच्याशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Kolhapur
KolhapurSaam
Published On: 

कोल्हापुरातील शाहूपुरीमध्ये पोलीस पेशाला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रूग्णालयात जबाब घेण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने एका अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केले आहे. मुलीशी असभ्य वर्तन केल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे.

शाहूपुरीतील एका तरूणीने हातापायाला कापून घेतले होते. त्यानंतर तिला तातडीने खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तरूणीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. तरूणीचा जबाब नोंदवण्यासाठी अतिदक्षता विभागात पोलीस चेतन घाटगे पोहोचला. त्याने रात्री ८:३० च्या दरम्यान तरूणीचा जबाब नोंदवून घेतला.

Kolhapur
Pune News: पुणेकरांनो कृपया लक्ष असूद्या! रेल्वे मार्गावर ३ दिवसांचा ब्लॉक, लोकल- एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल

तरूणीचा जबाब नोंदवून झाल्यानंतर पोलिसाने तिला आपला मोबाईल क्रमांक दिला. "तू माझी मैत्रीण आहेस. घाबरू नकोस. काही अडचण आली तर, मला फोन कर", असे सांगत त्याने मुलीच्या शरीराच्या ठिकठिकाणी स्पर्श केला. तसेच छातीलाही स्पर्श केला.

Kolhapur
Maharashtra Politics: शहाजी बापूंना "ती" चूक कळाली, भरसभेत स्वत:च्या थोबाडीत मारून घेतलं

या प्रकरणाची माहिती पीडित मुलीने आपल्या कुटुंबाला दिली. पीडित मुलीने थेट पोलीस नाईक चेतन घाटगे विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलीस विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणानंतर परिसरातील नागरिकांनी पोलीस नाईकविरोधात रोष व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com