Train Accident: हृदयद्रावक! आधी सासूला उडवलं, नंतर सुनेलाही रेल्वेची धडक; काही मिनिटांत दोघींचा मृत्यू

Double Train Accident Tragedy: मुंबईत एका तरुणाचा कामावर जात असताना रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आणखी एक हृदयद्रावक घटना घडली आहे.
railway news
railway newssaam tv
Published On

मुंबईत एका तरुणाचा कामावर जात असताना रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. अवघ्या काही मिनिटातच सासू आणि सूनेचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना मुंब्रा परिसरात घडली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुंब्रा रेतीबंदर येथील राणानगर येथे राहणाऱ्या सासू आणि सूनेचा अवघ्या काही वेळाच्या अंतराने रेल्वे धडकेत मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना गुरूवारी दुपारी १ ते १.२० वाजण्याच्या सुमारास घडली. निता पवार (७५) असे सासूचे तर विजया पवार (४०) सुनेचे नाव आहे. सासू निता यांना लोकलची धडक लागल्याचे कळताच, सुनेनं त्या ठिकाणी धाव घेतली. रेल्वे रूळावर सून येताच विजया हिलाही लोकलने धडक दिली. या रेल्वे धडकेत दोघांचाही मृत्यू झाला आहे.

railway news
Crime: आधी शेवया मागायला आला, नकार देताच धारदार शस्त्रानं सपासप वार; घरात वाहिला रक्ताचा पाट

नेमकं काय घडलं?

मुंब्रा-कळव्या रेल्वे रूळालगतच्या राणानगर मुंब्रा रेतीबंदर येथे निता आणि विजया त्यांच्या कुटुंबासोबत राहत होत्या. दुपारी १ च्या दरम्यान, निता पवार यांना जलद लोकलची धडक बसली. या घटनेनंतर अवघ्या काही मिनिटातच १.२० वाजण्याच्या सुमारास सासूचा अपघात झाल्याचे कळताच सून विजयाने रेल्वे रूळाच्या दिशेने धाव घेतली.

railway news
Mumbai News: नोकरीचा दिवस अखेरचा ठरला; धावत्या लोकलमधून पडून डोंबिवलीच्या तरुणाचा मृत्यू

त्यावेळी विजयालाही देखील लोकलची धडक बसली. याच धडकेत विजया गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या सासूला उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात नेले. तसेच पोलिसांनी विजया हिलाही उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यानच सासू सूनेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी ठाणे रेल्वे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com