Shahapur  Saam Tv
मुंबई/पुणे

Crime: नाचताना धक्का लागला, रागात सपासप वार करून तरुणाला संपवलं; लग्नात रक्तरंजित राडा

Minor Dispute at Wedding News: लग्नसमारंभात नाचताना धक्का लागल्याच्या रागातून २१ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी मृतदेह नदीपात्रात फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Bhagyashree Kamble

लग्नात नाचताना धक्का लागल्याच्या रागातून २१ वर्षीय तरूणाचा चाकूने भोसकून हत्या करण्यात आली आहे. तसेच मृतदेह नदी पात्रात फेकल्याची माहिती समोर आली आहे. ही धक्कादायक घटना शहापूर तालुक्यातील कासगाव हद्दीत घडली आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळू वाघ असे मृत तरूणाचे नाव आहे. तो शहापूर तालुक्यातील काजगावात कुटुंबासह राहत होता. उदर्निवाहसाठी बाळू याच गावात ट्रॅक्टर चालक म्हणून कार्यरत होता. २५ मार्चला गावात एक लग्न होते.

याच लग्नात बाळू गेला आणि त्याने मनसोक्त डान्स केला. नाचत असताना बाळूचा धक्का एका १७ वर्षीय मुलाला लागला. याच दरम्यान दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर २ अल्पवयीन मुलांनी बाळूला निर्जनस्थळी गाठून त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. नंतर त्याचा मृतदेह भातसा नदी पात्रात फेकून दिला.

दरम्यान २६ मार्चला नदीवर पुरूषाचा मृतदेह तरंगताना दिसत होता. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नंतर जीवक्षक पथकातील सदस्यांच्या सहकाऱ्याने त्यांनी मृतदेह बाहेक काढले. तसेच मृतदेह शवविच्छदनासाठी शहापूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. शवविच्छदनाच्या अहवालातून बाळू वाघ याची हत्या झाल्याचे समोर आले.

पोलिसांनी आोरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. तसेच दोन्ही १७ वर्षीय विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेतले. बाल न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी भिवंडीतील बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saturday Horoscope: शनिदेवांच्या कृपेने कोणाचे नशीब उजळणार, कोणाला घ्यावी काळजी? वाचा उद्याचे संपूर्ण राशीभविष्य

Maharashtra News Live Update: चाकणच्या घटनेनंतर शिरूरमध्येही महिलेवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

Halwai Style Jalebi: सण किंवा खास प्रसंगी घरच्या घरी बनवा हलवाईसारखी केशर जिलेबी; नोट करा ही सोपी रेसिपी

रंग गोरा करण्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी क्रीममागे दहशतवाद्यांचा काळा चेहरा? नांदेडमधील FDA कारवाईनंतर ATS ची एन्ट्री होणार?

Blue Jeans Ban: 'या' देशात निळी जीन्स घातल्यास होतो तुरुंगवास?

SCROLL FOR NEXT